शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

बीड ते पश्चिम बंगाल; व्हॉट्सॲपवर व्हिडीओ आला अन् ३१ वर्षांनी चुलता सापडला

By सोमनाथ खताळ | Updated: December 10, 2022 16:45 IST

कामासाठी गाव सोडलेल्या चुलत्याला आणण्यासाठी पुतण्यांनी गाठले पश्चिम बंगाल

- सोमनाथ खताळबीड : पाच भाऊ आणि चार बहिणी. परिस्थिती हलाखीची असल्याने कोणलाही न सांगता २१ व्या वर्षी कामासाठी गाव सोडले. तब्बल ३१ वर्षे हॉटेलवर वेटर म्हणून काम केले; परंतु एका कोल्हापूरच्या व्यक्तीने तयार केलेल्या व्हिडीओने नातेवाइकांना चार दिवसांपूर्वी माहिती मिळाली. पुतण्यांनी कसलाही विचार न करता २ हजार किमीचा प्रवास करत पश्चिम बंगाल गाठले. शुक्रवारी दुपारी ३ वाजता ते बंगालहून बीडच्या दिशेने निघाले आहेत. सोमवारपर्यंत ते घरी येणार असून, पाहण्यासाठी नातेवाइकांचे डोळे आतूर झाले आहेत.

रमेश माणिकराव उबाळे (वय ५१, रा. चऱ्हाटा, ता. बीड) असे या व्यक्तीचे नाव आहे. १९९१ साली रमेश यांनी घर साेडले होते. मुंबईतून एका रेल्वेत बसले आणि थेट पश्चिम बंगाल गाठले. येथील चिलगुडी येथील कृष्णा नावाच्या हॉटेलात वेटर म्हणून रोजंदारीवर काम सुरू केले. तब्बल ३१ वर्षे ते एकाच हॉटेलात राहिले. इकडे भाऊ नारायण उबाळे यांनी दोन वेळा बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली; परंतु शोध लागला नाही. अखेर कोल्हापूर येथील प्रकाश पानसरे नामक व्यक्ती मदतीसाठी धावून आला. पानसरे यांचा टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय असून, ते जेवणासाठी कृष्णा हॉटेलवर थांबले होते. त्यांनी विचारपूस केली असता ते उबाळे यांनी बीड जिल्ह्यातील असल्याचे सांगितले. त्यांनी रमेश उबाळे यांचा एक व्हिडीओ तयार केला. गुगलवरून चऱ्हाटा गाव शोधले. त्यांना एका पानटपरीचा संपर्क मिळाला. टपरीचालकाला फोन करून त्याच्या व्हाॅट्सॲपवर तो व्हिडीओ पाठवला. टपरीचालकानेही लगेच गावातील ग्रुप आणि सर्व उबाळे नावाच्या लाेकांपर्यंत तो पोहोचवला.

हा आपलाच भाऊ असल्याचे खात्री पटताच उबाळे बंधूंनी पानसरे यांना संपर्क करून हॉटेलचा पत्ता मिळवला. हॉटेलचालकाशी बोलून पोलिसांनाही कल्पना दिली. ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोनि. संतोष उबाळे यांनी पत्र दिल्यावर लगेच दत्ता व कैलास उबाळे हे दोन पुतणे चुलत्याला आणण्यासाठी तीन दिवसांपूर्वी रवाना झाले. शुक्रवारी सकाळी त्यांनी रमेश उबाळे यांना सोबत घेऊन परतीचा मार्ग धरला आहे. ३१ वर्षांनी रमेश उबाळे परत येत असल्याने नातेवाइकांमध्ये आनंद असून, त्यांना पाहण्यासाठी सर्वच आतुर झाले आहेत.

झोपेतून उठताच दिसले पुतणेशुक्रवारी पहाटे ३ वाजता दत्ता व कैलास हे पुतणे कृष्णा हॉटेलवर पोहोचले; परंतु ते झोपेत होते. त्यांच्या उठण्याची वाट त्यांनी पाहिली. सकाळी ६ वाजता डोळे उघडताच त्यांना आपले दोन्ही पुतणे दिसले. तोडकी मोडकी मराठी आणि हिंदी, बंगाली बोलणाऱ्या रमेश उबाळे यांनी पुतण्यांना चहापान करून लगेच पिशवी भरली. गावापासून २ हजार किमी दूर राहिलेले रमेश हे शुक्रवारी दुपारी पुतण्यांसोबत न्यू पायगुरी येथील रेल्वे स्थानकावरून परतीच्या दिशेने निघाले होते.

सर्व कुटुंब आनंदी आहेसाधारण १९९१ साली चुलते निघून गेल्याचे नातेवाईक सांगतात. कोल्हापूरमधील पानसरे यांनी केलेल्या व्हिडीओवरून शोध लागला. आता आम्ही प. बंगालमध्ये असून, चुलत्याला घेऊन परत निघालो आहोत. किमान दोन ते तीन दिवस आम्हाला लागतील. ३१ वर्षांनी चुलता परत येत असल्याने नातेवाईक, कुटुंबातील सर्वच लोक आनंदी आहेत.- दत्ता उबाळे, चऱ्हाटा बीड

टॅग्स :BeedबीडSocial Mediaसोशल मीडियाwest bengalपश्चिम बंगाल