शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

बीड ‘रापम’ कार्यालयात भर दुपारी ‘फ्री स्टाईल’ हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2019 23:51 IST

कार्यालयीन कामाच्या वादातून हेल्पर व लिपीकामध्ये चांगलीच ‘फ्री स्टाईल’ हाणामारी झाली. ही घटना राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यालयात गुरूवारी दुपारी घडली.

ठळक मुद्देवाद : हेल्पर आणि लिपिकात जुंपली; उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात नोंद नाही

बीड : कार्यालयीन कामाच्या वादातून हेल्पर व लिपीकामध्ये चांगलीच ‘फ्री स्टाईल’ हाणामारी झाली. ही घटना राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यालयात गुरूवारी दुपारी घडली. रात्री उशिरापर्यंत याबाबत ठाण्यात नोंद झाली नव्हती.विभागीय कार्यालयात विविध कामांसाठी जिल्ह्यातील कर्मचारी येत असतात. गुरूवारी दुपारीही माजलगाव आगारात कार्यरत असलेले तंत्रज्ञ बीडला आले. संबंधित लिपीकाला कार्यालयीन कामकाजाबाबत विचारणा केली. बोलता बोलता त्यांच्यात वाद झाले. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. इतर कर्मचाऱ्यांनी तात्काळ धाव घेत दोघांचे भांडण सोडविले. मात्र, या भांडणाने कार्यालयात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.दरम्यान, विभागीय कार्यालयात सुरक्षिततेच्या दृष्टीने काहीच उपाययोजना केलेल्या नाहीत. सुरक्षा रक्षक मुख्य प्रवेशद्वाराला असतात तर सीसीटीव्ही कॅमेरेही बसविलेले नाहीत. त्यामुळे एसटीमधील कर्मचाऱ्यांची सुरक्षितता धोक्यात आली आहे.हाणामारी करणारे दोघेही नातेवाईककार्यालयात हाणामारी खेळणारे दोन्ही कर्मचारी नातेवाईक असल्याचेही विश्वसनिय सूत्रांनी सांगितले. दोघांच्या वादाबद्दल समजताच संघटना व इतर कर्मचाºयांनी मध्यस्थी करून तात्पुरते प्रकरण मिटविले. याबाबत दोघेही उशिरापर्यंत ठाण्यात गेले नव्हते.कार्यालय कारवाई करणार का ?कार्यालयात भांडण झाल्याने रामपची प्रतिमा मलीन झाली आहे. दोघांचे वाद मिटले असले तरी कार्यालयात वाद होणे हे चुक आहे. आता यावर वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करतात, याकडे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Beedबीडstate transportएसटी