शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

सासूला दागिने न देण्याच्या उद्देशाने सुनेने केलेला चोरीचा बनाव बीड पोलिसांनी केला उघड 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2017 19:25 IST

मागील काही दिवसांपासून घरगुती वादातून चोरीचा बनाव करून पोलिसांची पळपळवी करण्याचे प्रकार वाढले आहेत. असाच एक प्रकार बुधवारी समोर आला. बीड शहरातील अंबिका चौकात झालेली चोरी नसून बनाव असल्याचे तपासातून समोर आले.

ठळक मुद्दे दीड तोळ्याच्या गंठनसाठी सासू-सुनेचा वाद होता. . सासूला गंठन न देण्याचा उद्देशाने सुनेने हा बनाव केला.

बीड : मागील काही दिवसांपासून घरगुती वादातून चोरीचा बनाव करून पोलिसांची पळपळवी करण्याचे प्रकार वाढले आहेत. असाच एक प्रकार बुधवारी समोर आला. बीड शहरातील अंबिका चौकात झालेली चोरी नसून बनाव असल्याचे तपासातून समोर आले. दीड तोळ्याच्या गंठनसाठी सासू-सुनेचा वाद होता. सासूला गंठन न देण्याचा उद्देशाने सुनेने हा बनाव केला. यामध्ये मात्र पोलिसांची चांगलीच धावपळ झाली. घराच्या बाहेर पडलेल्या ‘किल्ली’वरून हा तपास लागला.

बीड शहरातील अंबिका चौक हा नेहमी गजबजलेला असतो. ऐन चौकातील बाजूच्या अपार्टमेंटमध्ये संध्या व गोरख शिंदे हे दाम्पत्य राहतात. सकाळी आठ वाजता गोरख शिंदे हे परभणीला गेले होते तर संध्या शिंदे या पांगरी येथील एका महाविद्यालयात प्राध्यापक असल्याचे सांगत सकाळी नऊ वाजताच घराबाहेर पडल्या होत्या. त्यानंतर दहा वाजता मुलगा प्रमोद हा घरी आल्यावर त्याला हा चोरी झाल्याचे समजले, असे संध्या शिंदे यांनी पोलिसांना सांगितले. पोलिसांना काही मुद्दे खटकले. त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यांना तीन व्यक्ती घरात आल्याचे दिसले. सर्वांची शहानिशा केली असता एकावरही संशय बळावला नाही. त्यांनी मग संध्या शिंदे यांचीच चौकशी केली. त्यांना फिर्याद देण्यासाठी बोलाविले. परंतु त्यांनी नकार देत आपले पैसे व दागिने असल्याचे सांगितले.

पोलिसांनी खोलवर जावून तपास केल्यावर हा प्रकार घरगुती वादातून केल्याचे समजले. सासू-सुन या दोघींमध्ये दीड तोळ्याच्या गंठनसाठी वाद होता. सासू हे गंठन परत मागत होती, तर सुनेचा विरोध होता. सासुला गंठन न देण्याच्या उद्देशाने सुनेने घरात चोरी झाल्याचा बनाव केला आणि दीड तोळ्याच्या गंठनसह दहा हजार रूपये रोख रक्कम गेल्याचे पोलिसांना सांगितले होते. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे टिमसह घटनास्थळी दाखल झाले. यावेळी त्यांना मुख्य गेटवर कुलपाची किल्ली सापडली. याच किल्लीने चोरीचा बनाव उघडा  पाडण्यास मदत झाली. पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक  पाळवदे, शिवाजीनगर ठाण्याचे पोनि नानासाहेब लाकाळ, फौजदार भूषण सोनारसह टिमने हा तपास लावला.

ग्रा.पं.बंदोबस्तामुळे व्यस्तमंगळवारी जिल्ह्यातील १५७ ग्रामपंचायतसाठी मतदान असल्याचे पोलीस व्यस्त होते. हाच फायदा घेऊन या महिलेने चोरीचा बनाव केला. परंतु पोलिसांनी सर्व परिस्थिती सांभाळून हा बनाव उघड केला. खोटी माहिती देऊन पोलिसांची धावपळ करणे, हे चुकीचे असल्याची भावना व्यक्त होत असून यामुळे खर्‍या घटनांकडे दुुर्लक्ष होण्याची दाट शक्यता आहे.

तपास सुरु आहे घरगुती वादातून हा चोरीचा बनाव केला होता. सविस्तर तपास सुरूच आहे. संबंधितांवर कारवाई केली जाईल.- जी. श्रीधर पोलीस अधीक्षक, बीड