शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये चोरीच्या ११ दुचाकींसह दोघे ताब्यात; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 19:36 IST

शहरातून दुचाकी चोरून गावाकडे नेऊन विक्री करण्याचा प्रयत्नात असलेल्या दुचाकी चोरांच्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. ही कारवाई गुरूवारी रात्री करण्यात आली. विकास इंगळे (१९ रा.कोळगाव ता.गेवराई) व अन्य एक अल्पवयीन आरोपीसह ११ दुचाकी ताब्यात घेण्यात आल्या आहेत.

बीड : शहरातून दुचाकी चोरून गावाकडे नेऊन विक्री करण्याचा प्रयत्नात असलेल्या दुचाकी चोरांच्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. ही कारवाई गुरूवारी रात्री करण्यात आली. विकास इंगळे (१९ रा.कोळगाव ता.गेवराई) व अन्य एक अल्पवयीन आरोपीसह ११ दुचाकी ताब्यात घेण्यात आल्या आहेत. आणखीही काही दुचाकी सापडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

विकासचे आई-वडील मजुरी करतात तर अवघे १५ वर्षे वय असलेल्या अल्पवयीन आरोपीला आई-वडील नाहीत. दोघेही एकाच गावातील असल्याने त्यांची चांगलीच मैत्री होती. मौजमजेसाठी पैसे लागत असल्याने त्यांनी दुचाकी चोरी करण्याचा व्यवसाय निवडला. मागील दीड महिन्यापासून त्यांनी बीड शहरातून तब्बल ११ दुचाकी चोरल्या. या सर्व दुचाकी त्यांनी कोळगावला विकासच्या घरात ठेवल्या. विकासच्या मोठ्या भावाची कोळगाव रोडला टपरी आहे. त्यामुळे तो घरी येत नसे. आई-वडीलही वेगळ्या घरात राहत असल्याने त्यांची घरात लक्ष नव्हते. याचाच फायदा घेऊन त्यांनी घरात दुचाकी लपवल्या. एकवेळेस भावाने विचारले, तर यांनी बीडमध्ये आपल्या ओळखीचे लोक असून त्यांच्या गोडाऊनमध्ये जागा नसल्याने गावाकडे दुचाकी आणल्याचे सांगितल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, गुरूवारी यातील अल्पवयीन आरोपी हा बीडमध्ये भाजीमंडई भागात दुचाकी चोरण्याचा प्रयत्न करीत होता. हा प्रकार पोलीस कर्मचारी उबाळे यांना दिसला. त्यांनी पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे यांना माहिती दिली. त्याप्रमाणे सापळा लावला. पोलीस पाठलाग करीत असल्याचे समजताच त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला. परंतु  पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि घनश्याम पाळवदे, सपोनि रवी सानप, दिलीप तेजनकर, सचिन पुंडगे, मोहन क्षिरसागर, श्रीमंत उबाळे, रवी उबाळे, बालाजी दराडे, नरेंद्र बांगर, शेख नसीर, सतिष कातखडे, सखराम सारूक, परमेश्वर सानप, चालक राठोड आदींनी केली.

दोघेही नवीन गुन्हेगारमागील काही दिवसांपासून नव्या गुन्हेगारांच्या टोळ्या बनू लागल्या आहेत. त्यामुळे तपास लावण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. या प्रकरणातील दोन्ही आरोपी हे नवीन आहेत. तसेच यापूर्वी गेवराईत लुटमार करणारे आरोपीही नवीनच होते, असे तपासातून समोर आले होते.

टॅग्स :PoliceपोलिसBeedबीड