शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

बीड जिल्हा परिषदेच्या सुनावणीमध्ये २४ शिक्षक ठरले दोषी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 00:48 IST

जिल्हा परिषदेतील ३७३ शिक्षकांची गुरुवारी सुनावणी झाली. त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. यातील २३२ तक्रारींमध्ये तथ्य आढळून नसल्याचे समजते, तर २४ तक्रारींमध्ये दोषी आढळलेल्या संबंधित शिक्षकांकडून खुलासे मागवून त्यांच्यावर कठोर कारवाई होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

ठळक मुद्देकठोर कारवाई होणार : २३२ तक्रारींमध्ये तथ्य नसल्याचे आढळले; ३५ तक्रारी तांत्रिक त्रुटींच्या

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्हा परिषदेतील ३७३ शिक्षकांची गुरुवारी सुनावणी झाली. त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. यातील २३२ तक्रारींमध्ये तथ्य आढळून नसल्याचे समजते, तर २४ तक्रारींमध्ये दोषी आढळलेल्या संबंधित शिक्षकांकडून खुलासे मागवून त्यांच्यावर कठोर कारवाई होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.बीड जिल्हा परिषदेतील ३४७१ शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या झाल्या होत्या. या बदल्यांसाठी आॅनलाईन अर्ज भरताना चुकीची व खोटी माहिती देत अनेक शिक्षकांनी बदलीचा फायदा घेतला होता. त्यामुळे अनेक शिक्षक विस्थापित झाले होते. यासंदर्भात जिल्हा परिषद प्रशासनाकडे तक्रारी दाखल झाल्या होत्या. आलेल्या ४१५ तक्रारीनुसार गुरुवारी सुनावणी ठेवण्यात आली होती; मात्र काही शिक्षकांनी अर्जाद्वारे स्वतंत्र तक्रारी केल्याची माहिती पुढे आली. त्यामुळे तक्रारींची संख्या ३७३ एवढी असल्याचे स्पष्ट झाले. एकूण ३७३ शिक्षकांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले. यामध्ये पती-पत्नीमधील अंतर कमी दाखविणे, नियुक्ती दिनांक चुकीचा दाखविणे, प्राथमिक पदवीधर विषय चुकीचा दाखविणे असे प्रकार आढळून आले. यात दोषी आढळलेल्या २४ पैकी १२ शिक्षकांवर यापूर्वीच कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.सेवाकनिष्ठाला पदस्थापना, कनिष्ठांकडून खो, पसंतिक्रमातील पद रिक्त असणे आदी प्रकारच्या ३५ तांत्रिक त्रुटी असणाऱ्या तक्रारी शासनाला कळविण्यात येणार आहेत.४९ अर्जांमध्ये पदस्थापना बदलाची विनंती करण्यात आली होती; परंतु जिल्हा परिषद स्तरावरून पदस्थापनेत बदल करता येणार नसल्याने तसेच संबंधित शिक्षकांना कळविण्यात येत आहे. काही शिक्षकांची पदस्थापना मिळाले नसल्याची तक्रार होती, त्यांना समायोजनात पदस्थापना देण्यात येणार असल्याचे समजते.१२८ अतिरिक्त शिक्षकांचे रविवारी समायोजनजिल्हा परिषदेतील १२८ अतिरिक्त शिक्षक, प्राथमिक पदवीधर आणि मुख्याध्यापकांचे समायोजन २२ जुलै रोजी सकाळी १० वाजेपासून करण्यात येणार आहे. शिक्षणाधिकारी भगवानराव सोनवणे यांनी ही माहिती दिली.३० सप्टेंबरचे समायोजन उशिरा झाल्यामुळे १२८ पदे अतिरिक्त झाली होती. अतिरिक्त शिक्षक, प्रा.प. आणि मुख्याध्यापकांच्या याद्या पंचायत समिती कार्यालयात लावण्यात आल्या असून जिल्हातंर्गत बदल्यात पदस्थापना न मिळालेल्यांना रविवारी होणाºया समायोजनेत पदस्थापना मिळणार आहे.

टॅग्स :Beedबीडzp schoolजिल्हा परिषद शाळाTeacherशिक्षक