शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

...पुन्हा एक नकुशी रुग्णालयाच्या कचराकुंडीत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2020 02:38 IST

अंबाजोगाईत खळबळ; सुरक्षा रक्षकाच्या सतर्कतेमुळे मिळाले जीवदान

अंबाजोगाई (जि. बीड) : येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय परिसरात पुन्हा एका स्त्री अर्भकाला प्लास्टिकच्या पिशवीत घालून कचराकुंडीत फेकल्याचे सोमवारी सकाळी उघडकीस आले. सुरक्षा रक्षकाने ती पिशवी पाहिल्याने त्या अर्भकाला जीवदान मिळाले असून ती ‘नकुशी’ सध्या रूग्णालयातील बालकक्षात उपचार घेत आहे.‘स्वाराती’ परिसरात एका कचराकुंडीत हे अर्भक प्लास्टिकच्या पिशवीत घालून निर्दयी मातेने फेकून दिले. रूग्णालयातील एका सुरक्षा रक्षकाची नजर कचराकुंडीकडे गेल्याने त्याला संशय आला. पिशवी पाहिल्यावर त्याला अर्भक दिसले. ते अर्भक त्याने रूग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी केली असता ते जीवंत दिसल्याने लगेच उपचार सुरू करण्यात आले. याबाबत पोलिसांत तक्रार देण्याचे आदेश दिलेले आहेत. आमच्या रुग्णालयातील हे बाळ नाही. सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर खरा प्रकार समजेल. सध्या बाळाची प्रकृती स्थिर असल्याच् अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुकरे यांनी सांगितले.नकुशी समजून टाकलेल्या अर्भकाचा मृत्यूऔरंगाबाद : पाच मुलींनंतर जन्मलेल्या आणि आईने नकोशी समजून शेतात फेकलेल्या टुणकी (जि. औरंगाबाद) येथील बाळाने औरंगाबादेतील घाटी रुग्णालयात उपचार सुरू असताना सोमवारी पहाटे अखेरचा श्वास घेतला. जन्मानंतर लगेच आईच्या कुशीला मुकलेल्या या बाळाची गेल्या ६ दिवसांपासून मृत्यूशी झुंज सुरू होती. ही झुंज अपयशी ठरली.पाच मुलींनंतर सहाव्यांदाही मुलगी झाल्याचा समज करून या बाळाला मातेनेच शेतात फेकून दिल्याची घटना ३० सप्टेंबर रोजी घडली; परंतु गावात पुरुष जातीचे अर्भक सापडल्याच्या चचेर्नंतर हे नवजात बाळ माझेच असल्याचे मातेने म्हटले. बाळाचे वजन केवळ १२०० ग्रॅम होते.घाटीत दाखल झाल्यापासून प्रकृती चिंताजनक असल्याने बाळाला वॉर्मरमध्ये ठेवण्यात आले होते. जंतुसंसर्ग झाल्याने कृत्रिम आॅक्सिजनही देण्यात येत होता. प्रकृती अधिकच खालावल्याने सोमवारी पहाटे ५.२० मिनिटांनी मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.