शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

Beed: वरबाप म्हणतात, बालविवाह नव्हे तो साखरपुडा, समितीने फोटो दाखवून केला भंडाफोड, मुलगा, मुलीच्या आई-वडिलांसह वऱ्हाडींवर गुन्हा

By सोमनाथ खताळ | Updated: October 25, 2023 22:31 IST

Beed: भवानवाडी येथील २१ वर्षीय मुलाचा विवाह कारेगव्हाण येथील नववीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या मुलीसोबत २६ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता झाला. या विवाहाची कोणालाही माहिती होऊ दिली नाही; परंतु काही लोकांनी याचे फोटो बालकल्याण समितीला पाठविले.

- सोमनाथ खताळबीड -  २१ वर्षांच्या मुलासोबत अवघ्या नववीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या मुलीचा विवाह लावण्यात आला. बालकल्याण समितीकडे पुरावे येताच ग्रामसेवकाला चौकशीसाठी पाठविले. मुलगी व मुलगा या दोघांच्या आई-वडिलांना विचारणा केली. त्यांनी हा विवाह नसून केवळ साखरपुडा झाल्याचे सांगितले; परंतु समितीने दिलेले फाेटो दाखवताच त्यांचा भंडाफोड झाला. हा प्रकार बीड तालुक्यातील भवानवाडी येथे २६ सप्टेंबर रोजी घडला होता. यात २५ ऑक्टोबर राेजी पालकांसह वऱ्हाडींवर व पिंपळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भवानवाडी येथील २१ वर्षीय मुलाचा विवाह कारेगव्हाण येथील नववीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या मुलीसोबत २६ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता झाला. या विवाहाची कोणालाही माहिती होऊ दिली नाही; परंतु काही लोकांनी याचे फोटो बालकल्याण समितीला पाठविले. समितीने ग्रामसेवकामार्फत गावात जाऊन चौकशी केली, तर मुलगा व मुलीच्या वडिलांनी हा विवाह झालाच नाही, असा पवित्रा घेतला. केवळ साखरपुडा झाल्याचा दावा त्यांनी केला; परंतु ग्रामसेवकांनी समितीने पाठविलेले फोटो दाखविताच सर्वच शांत झाले. आपला भंडाफोड झाल्याचे लक्षात येताच त्यांनी विनंती केली; परंतु समितीचा आदेश असल्याने या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यासाठी ग्रामसेवकांनी पिंपळनेर पोलिस ठाणे गाठले. याप्रकरणी २५ ऑक्टोबर रोजी ग्रामसेवक रवींद्र सातपुते यांच्या फिर्यादीवरून नवरदेवासह त्याचे आई-वडील व मुलींचे आई-वडील आणि वऱ्हाडी मंडळीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक कैलास भारती हे करत आहेत.

टॅग्स :Beedबीड