शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवसांच्या वेतन कपातीला बीडच्या डॉक्टरांची हरकत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 19:16 IST

कोरोनाला हरविण्यासाठी सर्वच जण जीव धोक्यात घालून काम करीत आहेत. यात आरोग्य विभाग, पोलीस, पत्रकार आणि अत्यावश्यक सेवा देणाऱ्या अस्थापनांचा समावेश आहे. त्यांचेच वेतन कपात केले जात असल्याने संताप व्यक्त होत आहे.

ठळक मुद्दे ‘मॅग्मो’ संघटना : एकत्रित न जमता सोशल मिडीयावरून मागविले हरकत पत्र 

- सोमनाथ खताळ

बीड : आपत्ती निवारणासाठी राज्यातील शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीस देण्याचे आदेश शासनाने काढले होते. याला बीडच्याडॉक्टरांनी विरोध केला आहे. कोरोनामुळे एकत्रित न येता सोशल मिडीयाच्या माध्यमातून मॅग्मो ग्रुपवर हरकत पत्र मागविण्यात आले आहे. 

महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात कोरोना विषाणूचा दिवसेंदिवस प्रादुर्भाव वाढत आहे. राज्यातही लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था कोलमडली आहे. त्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. हाच धागा पकडून काही संघटनांनी राज्य शासनाकडे एक ते दोन दिवसांचे वेतन मदत कायार्साठी कापावे असे निवेदन दिले होते. त्यावर विचार करुन शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने सोमवारी आदेश काढत राज्यातील सर्व भा.प्र.से., भा.पो.से., भा.व.से. व राज्य शासनाचे गट अ व गट ड चे (राजपत्रित) अधिकारी व कर्मचाऱ्यांचे दोन दिवसांचे कापले जाईल, तसेच गट ब (अराजपत्रित), गट क व ड चे कर्मचारी यांचे एक दिवसाचे वेतन सहाय्यता निधीला दिले जाणार आहे. वेतन कपातीस हरकत असल्यास संबंधितांनी विभागप्रमुखास लेखी द्यावे, असेही आदेशात म्हटले होते. त्याप्रमाणे बीडच्या सरकारी डॉक्टरांनी याला विरोध केला आहे. आमचे वेतन कपातीस हरकत असल्याचे प्रमाणपत्रच त्यांनी दिले आहे. कोरोनामुळे याविरोधात एकत्र येऊन लढा उभारणे योग्य नाही, म्हणून सर्व डॉक्टरांनी मॅग्मो ग्रुपच्या माध्यमातून सर्वांचे हरकत प्रमाणपत्र मागविले आहेत.

जीव धोक्यात घालून कामकोरोनाला हरविण्यासाठी सर्वच जण जीव धोक्यात घालून काम करीत आहेत. यात आरोग्य विभाग, पोलीस, पत्रकार आणि अत्यावश्यक सेवा देणाऱ्या अस्थापनांचा समावेश आहे. त्यांचेच वेतन कपात केले जात असल्याने संताप व्यक्त होत आहे. हे वेतन कपात करू नये, अशी मागणी जोर धरू लागली आहे. 

दोन दिवसांच्या वेतन कपातीला आमची हरकत आहे. किमान आरोग्य विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे वेतन कपात करू नये. आम्ही आमच्या प्रमुखांना हरकत पत्र देत आहोत, हे खरे आहे. या वेतन कपातीला आमचा विरोध आहे. - डॉ.मिर्झा साजीद बेग, अध्यक्ष, मॅग्मो संघटना बीड जिल्हा

टॅग्स :doctorडॉक्टरBeedबीडcorona virusकोरोना वायरस बातम्या