शहरं
Join us  
Trending Stories
1
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
2
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
3
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
4
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
5
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
6
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
7
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
8
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
9
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
10
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
11
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
12
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
13
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
14
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
15
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
16
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
17
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
18
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
19
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
20
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...

उपसंचालकांनी केले बीड जिल्हा रूग्णालयाचे ‘आॅपरेशन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 00:07 IST

लातूर विभागाचे आरोग्य उपसंचालक डॉ.एकनाथ माले यांनी सोमवारी अचानक जिल्हा रूग्णालयास भेट दिली. यावेळी त्यांनी सर्व रूग्णालयाचा आढावा घेण्याबरोबरच डॉक्टरांची हजेरी घेतली.

ठळक मुद्देदांडीबहाद्दरांवर होणार कारवाई : स्वच्छता, आरोग्य सेवेवर लक्ष देण्याच्या सूचना; गैरहजर राहणाऱ्या डॉक्टरांवर कारवाईचा दिला इशारा

बीड : लातूर विभागाचे आरोग्य उपसंचालक डॉ.एकनाथ माले यांनी सोमवारी अचानक जिल्हा रूग्णालयास भेट दिली. यावेळी त्यांनी सर्व रूग्णालयाचा आढावा घेण्याबरोबरच डॉक्टरांची हजेरी घेतली. दांडी बहाद्दरांवर तात्काळ कारवाई करून आरोग्य सेवा व स्वच्छतेवर विशेष लक्ष देण्याचे आदेश माले यांनी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सकांना दिले. उपसंचालकांनी अचानक येऊन ‘आजारी’ रूग्णालयाचे ‘आॅपरेशन’ केल्यामुळे प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली.जिल्हा रूग्णालयातआल्यावर बाह्य रूग्ण विभागात तात्काळ व तत्पर सेवा मिळत नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर उपसंचालक डॉ.माले यांनी सोमवारी अचानक सर्व बाह्यरूग्ण विभागाची तपासणी केली. नेहमीप्रमाणे अस्थि व बालरोग विभागातील डॉक्टर गैरहजर होते. रूग्णांच्या बाहेर लांबच लांब रांगा होत्या.त्यानंतर त्यांनी सर्वच विभागात जावून आढावा घेण्याबरोबरच रूग्ण व नातेवाईकांशी संवाद साधून अडचणी जाणून घेतल्या. आलेल्या तक्रारींचे तात्काळ निरसन करून तात्काळ व दर्जेदार सेवा देण्याचे आदेश डॉ.माले यांनी आरोग्य प्रशासनाला दिले. यावेळी त्यांच्यासमवेत अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुखदेव राठोड, डॉ.सतीश हरिदास, मेट्रन खैरमोडे यांची उपस्थिती होती.दरम्यान, डॉ. माले यांच्या भेटीच्या जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या कारभारावर कितपत परिणाम होतो, हे येणारी वेळच ठरविणार आहे. परंतु सोमवारी दिलेल्या अनेक आश्वासनांनी सर्वसामान्यांना एक प्रकारे दिलासा मिळाला आहे. आता याची तत्काळ अंमलबजावणी करणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :BeedबीडBeed civil hospitalजिल्हा रुग्णालय बीड