बीड : येथील जिल्हा रुग्णालयातील रेकॉर्ड रुमला बुधवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास आग लागली. यामध्ये महत्त्वाचे कागदपत्रे जळून खाक झाले. रात्री उशिरापर्यंत आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न अग्निशमन विभागाकडून सुरू होते.जिल्हा रूग्णालयात अस्थापना विभागाची तीन मजली इमारत आहे. पहिल्या मजल्यावर स्वयंपाक घर, दुसऱ्या मजल्यावर अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सतीश हरीदास यांचा कक्ष व सर्व अस्थापना विभाग व तिसºया मजल्यावर रेकॉर्ड रूम आहे. याच रेकॉर्ड रूमला रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. बाजुलाच पाठिमागे पोलीस कॉलनी आहे. येथील काही वॉक करणाºया तरूणींनी हा प्रकार पाहिल्यानंतर आरडाओरड झाली.
बीड जिल्हा रुग्णालयाच्या रेकॉर्ड रुमला आग; कागदपत्रे खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 00:33 IST