शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

बीड जिल्हा रुग्णालयास दिवाळी भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 00:44 IST

परळी येथे एका कार्यक्रमात शब्द दिल्याप्रमाणे राज्याचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी बीड येथील जिल्हा रुग्णालयातील आयसीयू विभागासाठी १२ मल्टीपॅरा मॉनिटरसाठी ६ लाख ५० हजारांचा निधी उपलब्ध केला

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : परळी येथे एका कार्यक्रमात शब्द दिल्याप्रमाणे राज्याचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी बीड येथील जिल्हा रुग्णालयातील आयसीयू विभागासाठी १२ मल्टीपॅरा मॉनिटरसाठी ६ लाख ५० हजारांचा निधी उपलब्ध केला आहे. यामुळे आयसीयू विभागा सुसज्ज होण्यास मोठा हातभार लागणार असून रुग्णांना उपचारासाठी सुविधा मिळणार आहे.जिल्हा रुग्णालयाचा पदभार स्वीकारल्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी रुग्णालयातील आवश्यक सुविधांसह रुग्णांवर परिपूर्ण उपचारासाठी प्रयत्न सुरु केले. शासन पातळीवर उपलब्ध होणारी मदत कामी आली. तरीही इतर सुविधांसाठी लोकसहभागातून मदत उभी करता येईल या हेतूने जिल्हा रुग्णालयातील आयसीयू कक्ष अद्ययावत करण्यासाठी डॉ. थोरात यांनी सामाजिक कार्यकर्ते गौतम खटोड यांच्याशी संपर्क साधून चर्चा केली. चर्चेनंतर स्व. झुंबरालाल खटोड सामाजिक प्रतिष्ठानतर्फे नवरात्रमध्ये आयसीयू विभागात १२ बेड उपलब्ध करुन देण्यात आले.दरम्यान, परळी येथे वैद्यनाथ देवस्थानच्या डायलेसिस सेंटरमध्ये जर्मन तंत्रज्ञानाची मेडिकल केअर मशीन राज्याचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी उपलब्ध करुन दिली होती. लोकार्पण कार्यक्रमात डॉ. थोरात यांनी डिगे यांच्याशी जिल्हा रुग्णालयाच्या आयसीयू विभागासाठी मदतीबाबत चर्चा केली. त्यावेळी डिगे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत १२ मल्टीपॅरा मॉनिटर मदतीची ग्वाही दिली होती. यानंतर डॉ. कमलाकर आंधळे यांनी एक मल्टीपॅरा मॉनिटरची भेट जिल्हा रुग्णालयासाठी दिली.सणाचे औचित्य साधत शिवकुमार डिगे यांनी उर्वरित लागणाऱ्या ११ मल्टीपॅरा मॉनिटरसाठी ६ लाख ५० हजार रुपयांचा निधी उपलब्ध करुन एका प्रकारे दिवाळीची भेटच बीडकरांना दिली आहे. अंबाजोगाई येथे या निधीचा धनादेश नुकताच त्यांनी डॉ. थोरात यांच्याकडे सुपूर्द केला.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलfundsनिधी