शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

बीड जिल्हाधिकारी कचेरीवर धडकला ओबीसींचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 00:10 IST

ओबीसी समाजाच्या हक्कांवर गदा आणणा-यांना समाज कधीच माफ करणार नाही. ओबीसींना हक्कापासून वंचित ठेवणा-या सरकारला ओबीसी समाज सत्तेपासून वंचित करील असे प्रतिपादन ओबीसी हक्क मोर्चाचे आयोजक, अ.भा. समता परिषदेचे विभागीय तथा बीड जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. सुभाष राऊत यांनी केले.

ठळक मुद्देहक्कावर गदा आणणाऱ्यांना ओबीसी समाज कदापि माफ करणार नाही : सुभाष राऊत

बीड : भाजपा युतीचे सरकार राज्यात स्थापन झाल्यापासून ओबीसी समाजाला घटनेनुसार मिळणा-या सर्वच हक्कांपासून वंचित ठेवण्यात आलेले असून विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, जातीनिहाय जनगणना, उच्च शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांचा शुल्क परतावा, मॅट्रीक पूर्व शिष्यवृत्ती, स्वाधार योजना आदी प्रश्नांवर विविध मागण्यांसाठी सोमवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर ओबीसी विद्यार्थ्यांसह समाजबांधवांचा मोर्चा काढण्यात आला.ओबीसी समाजाच्या हक्कांवर गदा आणणा-यांना समाज कधीच माफ करणार नाही. ओबीसींना हक्कापासून वंचित ठेवणा-या सरकारला ओबीसी समाज सत्तेपासून वंचित करील असे प्रतिपादन ओबीसी हक्क मोर्चाचे आयोजक, अ.भा. समता परिषदेचे विभागीय तथा बीड जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. सुभाष राऊत यांनी केले.आचार संहितेच्या तोंडावर घोषणांचा पाऊस पाडणाºया सरकारने ओबीसी समाजाला गेल्या चार वर्षात काहीच दिले नसल्याची खंत ओबीसी महामंडळाचे माजी अध्यक्ष बापूसाहेब भुजबळ यांनी मोर्चाला मार्गदर्शन करतांना व्यक्त केली.ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळालीच पाहिजे, जातीनिहाय जनगणनना झालीच पाहिजे, जय ज्योती जय क्रांती, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो अशा विविध घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकल्यानंतर झालेल्या सभेत मल्हार सेनेचे इंजि. विष्णू देवकते, सोनार समाजाचे अ‍ॅड. संदीप बेदरे, विद्यार्थी प्रतिनिधी नम्रता ठोंबरे, कुंभार समाजाचे अर्जुन दळे, भारती फुलेकर, सामाजिक कार्यकर्ते जे.डी. शाह, आयोजक अ‍ॅड. सुभाष राऊत, ओबीसी महामंडळाचे माजी अध्यक्ष बापूसाहेब भुजबळ आदींची समयोचित भाषणे झाली.व्यासपीठावर नाभिक समाजाचे विक्र म बिडवे, सोनार समाजाचे मंगेश लोळगे, परिट समाजाचे गणेश जगताप, शिवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन शहागडकर, मुंबईचे माजी नगरसेवक रविंद्र पवार, धनंजय वाघमारे, मुकेश शिवगण आदींची उपस्थिती होती. मोर्चात बीड जिल्ह्यातील ओबीसी विद्यार्थी, युवक,युवती, महिला,पुुरु ष हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते.

टॅग्स :BeedबीडBeed collector officeजिल्हाधिकारी कार्यालय बीडOBCअन्य मागासवर्गीय जातीMorchaमोर्चा