शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

बीड जिल्ह्यात पांढऱ्या सोन्याला फुलकिडे तर सोयाबीनला अळीचा शाप !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 19:06 IST

खरीप हंगामात पावसाने ओढ दिल्यामुळे पिकांची वाढ खुंटली आहे.

बीड : खरीप हंगामात पावसाने ओढ दिल्यामुळे पिकांची वाढ खुंटली आहे. जिल्ह्यातील मुख्य पीक असलेल्या बोंडअळी तसेच फुलकिड्यांचा प्रादुर्भाव झाला आहे. सोयाबीन पिकावर शेंगातील अळी मोठ्या प्रमाणावर दिसत असल्यामुळे  उत्पादनात घट होण्याची भीती कृषीतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

कृषी विभागाकडून जिल्हाभरात पिकांवरील कीड, रोग, अळींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली आहे. शेतकऱ्यांसमोर बोंडअळी रोखण्याचे आवाहन आहे. ज्या  महसूल मंडळामध्ये अधिक प्रमाणात बोंडअळी, फुलकिडे व शेंगातील अळीचा प्रादुर्भाव आहे त्या ठिकाणी  उपाययोजना राबविण्यासंदर्भात सूचना करण्यात आल्या. तसेच शेतकऱ्यांना फवारणी करताना औषधांचे प्रमाण, मिश्रण कसे करावे इ. विषयी मार्गदर्शन करण्यात येत आहे. 

बोंडअळीनंतर फुलकिड्यांचे प्रमाण अधिक वाढल्यामुळे हे कीडे कापसाच्या पानातील रस शोषून घेतात. परिणामी पानाचा आकार द्रोणासारखा होत असून, पाने लालसर रंगाची होत आहेत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना कापसावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाला की काय, अशी शंका येत आहे. पानातील रस शोषून घेतल्यामुळे कापूस पिकाची वाढ खुंटली आहे. यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना उपाययोजना सांगितल्या आहेत.  मात्र, पावसाने ओढ दिल्यामुळे पिके येतील काय ? तसेच फवारणीवर झालेला खर्च वाया जातो काय, अशी भीती शेतकऱ्यांना वाटत आहे.

सोयाबीन पिकावर शेंगातील अळीचा प्रादुर्भाव आढळून आल्यामुळे कापसासोबत सोयाबीनचेही नुकसान होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सोयाबीनच्या शेंगा येण्यास सुरुवात झाली आहे. सुरुवातीच्या काळापासूनच कीटकनाशक फवारणी तसेच प्रतिबंधात्मक उपाय केले तर शेंगातील अळीचा प्रादुर्भाव रोखता येऊ शकतो, असे मत कृषीतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

फुलकिडे रोखण्यासाठी उपाययोजनाफेप्रोनील ३० एमएल १० लिटर पाण्यामध्ये मिसळावे. या मिश्रणामध्ये १२ : १६ : ०० हे खत २०० ग्रॅम तसेच मॅग्नेशियम ५० ग्रॅम फवारणी केल्यानंतर पानावरील फुलकिडीचा प्रादुर्भाव थांबून पाने लालसर होत नाहीत. सोयाबीन पिकावरील शेंगातील अळी रोखण्यासाठी इमामेक्टीनबेंझाईन ३ ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी दिलीप जाधव व शिरूरचे कृषी पर्यवेक्षक दिलीप तिडके यांनी दिली. अधिक मार्गदर्शनासाठी कृषी विभाग व विद्यापीठाशी संपर्क साधण्याचेही त्यांनी आवाहन केले आहे.

टॅग्स :BeedबीडcottonकापूसFarmerशेतकरीagricultureशेती