शहरं
Join us  
Trending Stories
1
"नव्या चेहऱ्यांना संधी द्या"; जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, शरद पवारांच्या भूमिकेकडे लक्ष
2
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
3
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
4
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
5
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
6
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
7
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
8
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
9
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
10
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
11
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
12
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
13
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
14
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
15
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
16
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
17
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
18
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
19
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
20
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा

बीड जिल्हा बॅँकेला २ कोटी ६ लाखांचा नफा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 23:28 IST

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेला २ कोटी ६ लाख रुपये संचित नफा झाल्याची माहिती अध्यक्ष आदित्य सारडा यांनी दिली.

ठळक मुद्देआदित्य सारडा : आॅडीटचा ब दर्जा, शंभर टक्के वसुली करणाऱ्या सेवा संस्थांचा गौरव

बीड : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेला २ कोटी ६ लाख रुपये संचित नफा झाल्याची माहिती अध्यक्ष आदित्य सारडा यांनी दिली.बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ६४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आदित्य सारडा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यावेळी बँकेचे सभासद, शेतकरी व सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.प्रारंभी स्व.लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. या सभेत आदित्य सारडा यांनी बँकेच्या संचालक मंडळाने अहवाल वर्षामध्ये केलेल्या कामकाजाचा आढावा सभेसमोर विशद केला. ते म्हणाले, ३१ मार्च २०१९ अखेर वसूल भाग भांडवल ५७ कोटी ९४ लाख इतके आहे. बॅँकेकडे ६२४ कोटी १२ लाखाच्या ठेवी असून ३३५ कोटी ५६ लाख रुपयांची गुंतवणूक आहे. १०८१ कोटी ६४ लाख एवढे कर्जे असून बँकेस २ कोटी ६ लाख रूपये एवढा संचित नफा झालेला आहे. या आकडेवरुन बँक सक्षम होत असल्याचे निदर्शनास येते. वैधानिक लेखा परिक्षणामध्ये बँकेस ‘ब’ दर्जा प्राप्त झाला आहे. ही बँकेसाठी गौरवाची बाब असल्याचे ते म्हणाले. बँकेने ग्राहकांसाठी एनईएफटी, आरटीजीएस, रुपे डेबीट कार्ड, केसीसी क्रेडीट कार्ड, एसएमएस अलर्ट, ई-कॉम. इ. सुविधा सुरु केल्या आहेत. त्यामुळे शासनाकडून बँकेस प्राप्त होणारे विविध प्रकारचे अनुदान, पीक विमा नुकसान भरपाई, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, गॅस आदी अनुदान हे लाभधारकांच्या खाती थेट वर्ग होत आहेत व तत्परतेने सदरील रकमेचे वाटप करीत आहे.या सभेस ज्येष्ठ संचालक साहेबराव थोरवे, जिल्हा उपनिबंधक शिवाजीराव बडे, सर्व संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी बी.एस. देशमुख, उपव्यवस्थापक आर.व्ही. उबाळे, प्र.उप व्यवस्थापक के.यु. आघाव उपस्थित होते. उपाध्यक्ष गोरख धुमाळ यांनी आभार मानले.

टॅग्स :BeedबीडBanking Sectorबँकिंग क्षेत्र