शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

रिक्त पदांमुळे बीड जिल्हा प्रशासनाच्या कामकाजाची गती मंदावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 23:51 IST

जिल्ह्यातील महसूल प्रशासनासह इतर विभागातील रिक्त पदांमुळे प्रशासकीय कामकाजावर परिणाम होत असल्याचे चित्र आहे. तसेच एकाच अधिकाऱ्यावर मुळ पदासह इतर अनेक पदांची जबाबदारी असल्यामुळे त्यांना कामाचा ताण सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्देपदासोबतच अतिरिक्त जबाबदारी : रवींद्र परळीकर, प्रभोदय मुळे रुजू का होत नाहीत ?

प्रभात बुडूख ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यातील महसूल प्रशासनासह इतर विभागातील रिक्त पदांमुळे प्रशासकीय कामकाजावर परिणाम होत असल्याचे चित्र आहे. तसेच एकाच अधिकाऱ्यावर मुळ पदासह इतर अनेक पदांची जबाबदारी असल्यामुळे त्यांना कामाचा ताण सहन करावा लागत आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यात बदली होऊन रुजू होण्यासाठी आलेले निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र परळीकर व उपविभागीय अधिकारी प्रभोदय मुळे यांना रुजू करून घेतले नसल्याची सूत्रांची माहिती आहे.संपूर्ण जिल्ह्याचा कणा असणाºया महसूल विभागातील रिक्त पदांमुळे अनेक महत्त्वाच्या कामांची गती मंदावली आहे. याचा नाहक फटका सामान्य नागरिकांना बसत आहे. तीन उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, तलाठी यांच्यासह इतर कर्मचाºयांची पदे रिक्त आहेत. अपर जिल्हाधिकारी बी.एम. कांबळे यांच्याकडे बीड व अंबाजोगाई दोन ठिकाणचा पदभार आहे. उपविभागीय अधिकारी गणेश निºहाळी यांच्याकडे एस.डी.ओ पाटोदा व समन्वय भूसंपादन बीड, महेंद्रकुमार कांबळे यांच्याकडे उपजिल्हाधिकारी रोहियो व उपविभागीय अधिकारी बीड या पदांसह कांबळे यांच्याकडे इतर दोन विभागांचा देखील अतिरीक्त पदभार देण्यात आलेला आहे. त्यामुळे विभागातील अनेक प्रकरणांच्या सुनावण्या प्रलंबित राहत आहेत. उपजिल्हाधिकारी (सामान्य) सुनील भुताळे यांच्याकडे भूसंपादनाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी हे पद रिक्त आहे, याचा परिणाम धान्य वितरण कामकाजावर होत आहे. ई-पॉस मशिनचा वापर कमी होऊन आॅनलाईन धान्य पुरवठा टक्का घसरला आहे.पुरवठा विभागाला कोणी वाली राहिला नसल्याने तिथे मनमानी कारभार सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे.आष्टीचे तहसीलदार हिरामन झिरवाळ यांच्याकडे अतिरिक्त शिरुर तहसीलचा भार, धारुरचे तहसीलदार सुनील पवार यांच्याकडे अतिरिक्त वडवणीचे तहसीलदार पद देण्यात आले आहे. एकाच अधिकारी, कर्मचाºयांकडे इतर अतिरिक्त पदाचा कार्यभार असल्यामुळे त्यांच्यावर कामाचा अधिक ताण पडत आहे. त्यामुळे अनेक अधिकारी, कर्मचाºयांना तणाव, चिडचिडेपणा व इतर आरोग्यासंदर्भात समस्या उद्भवत असल्याचे काही अधिकाºयांसडून सांगण्यात आले.महसूल प्रशासनासह कृषी, बांधकाम, जिल्हा परिषद, पाटबंधारे, महावितरण, गृहविभाग, समाज कल्याण व इतर शासकीय विभागातील अधिकारी कर्मचाºयांची पदे रिक्त आहेत.परळीकर, मुळे आले राहिले आणि गेले ...४निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी व बीड उपविभागीय अधिकारी विकास माने यांची बदली आॅगस्ट महिन्यात झाली होती, त्यानंतर विधिमंडळ व रोहियो समिती कामकाजाचा आढावा घेण्यासाठी जिल्हा दौºयावर येणार असल्यामुळे या अधिकाºयांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने कार्यमुक्त क रण्यात आले नव्हते. मात्र दौरा रद्द झाला व त्यानंतर विकास माने यांनी औसा येथे पदभार स्वीकारला. त्यामुळे त्यांचे पद रिक्त झाले. त्यानंतर बदली होऊन जिल्ह्यात आलेले व रुजू होण्याच्या प्रतीक्षेत असणारे निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र परळीकर व उपविभागीय अधिकारी प्रभोदय मुळे हे रुजू होण्यासाठी बीड येथे आले. काही दिवस शहरात राहिले परंतु, त्यांना पदावर रुजू न करून घेतल्यामुळे ते परत निघून गेल्याची माहिती सूत्रांनी देली. मात्र पदे रिक्त असताना देखील त्यांना रुजू का करून घेतले नाही, याविषयी विविध तर्क,वितर्क लावले जात आहे.

टॅग्स :BeedबीडBeed collector officeजिल्हाधिकारी कार्यालय बीड