यावेळी भाजपाचे नगरसेवक जगदीश गुरखुदे, किरण बांगर, डॉ.लक्ष्मण जाधव, शांतीनाथ डोरले, डॉ.जयश्री मुंडे, लता बुंदेले, अनिता जाधव, भूषण पवार, बालाजी पवार, हरीष खाडे,नागेश पवार आदी उपस्थित होते. या प्रकरणी प्रतिक्रिया देताना राजेंद्र मस्के म्हणाले की, वनमंत्री संजय राठोड यांच्या दिशेने पुरावे समोर येत आहेत. फोनद्वारे झालेल्या संवादाच्या ऑडीओ क्लिप समाजात व्हायरल झाल्या आहेत. तरीसुद्धा पोलीस प्रशासनाकडून कोणतीच कारवाई झालेली नाही,असे मस्के म्हणाले. पोलिसांनी वनमंत्री संजय राठोड यांच्या वायरल झालेल्या सर्व ऑडीओ क्लिपची तपासणी करून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करावा. या प्रकरणाची नि:पक्षपातीपणे चौकशी व्हावी व मयत तरुणी पूजा चव्हाणला न्याय प्राप्त करून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मंत्री संजय राठोड यांना मंत्रीमंडळातून काढून टाकावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत मंत्री संजय राठोड यांच्या पुतळ्याला जोडे मारून दहन करण्यात आले.
पूजा चव्हाण प्रकरणी बीड भाजपाकडून संजय राठोड यांच्या पुतळ्याचे दहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 05:04 IST