- मधुकर सिरसटकेज ( बीड) : तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा धरण गुरुवारी ( दि. 28) सकाळी 10 वाजता 100 टक्के क्षमतेने भरल्या नंतर तीसऱ्यांदा 6 दरवाजे 0.50 मिटरने उघडण्यात येऊन 1,048.84 क्यूसेक्स ( 296.88 क्युमेक्स ) पाण्याचा विसर्ग मांजरा नदी पात्रात सोडण्यात आल्यामुळे लातुर जिल्ह्यासह कर्नाटक राज्यातील काही भागात पुर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, प्रशासनाने 152 गावच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
सध्या मांजरा धरणाचे 1 ते 6 आसे एकूण 6 दरवाजे गुरूवारी सकाळी 10 वाजता 0.50 मिटर उंचीने उघडण्यात आले आहेत. त्याद्वारे 1,048.84 क्यूसेक्स, ( 296.88 क्युमेक्स) पाण्याचा विसर्ग मांजरा नदीपात्रात सुरु आहे. त्यामुळे नदीला पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आसून महाराष्ट्र राज्यासह कर्नाटक राज्यातील मांजरा नदी किनारी राहणाऱ्या 152 गावच्या नागरिकांना कार्यकारी अभियंता अ ना पाटील यांनी सतर्कतेचा व सावधानतेचा इशारा दिला असल्याची माहिती, सहाय्यक कार्यकारी अभियंता अभिजित नितनवरे यांनी लोकमतशी बोलताना दिली.