शहरं
Join us  
Trending Stories
1
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
2
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
3
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
4
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
5
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
6
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच
7
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
8
Video: अमानवीय! आधी टक्कर मारली, मग गाडीखाली चिरडले; बैलाची अतिशय क्रुर हत्या...
9
इंट्राडे उच्चांकावरून थेट ११% घसरला हा शेअर, गुंतवणूकदारांना मोठा फटका; रेखा झुनझुनवालांचीही गुंतवणूक
10
Bhiwandi Crime: तोंडात कुरकुरे अन् निपचित पडलेला मृतदेह; कोर्टातून फरार झालेल्या आरोपीचा चिमुकलीवर अत्याचार
11
सचिन तेंडुलकरची गुंतवणूक असलेला शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% वधारला! दिला जातोय खरेदीचा सल्ला
12
Navi Mumbai Crime: इन्स्टाग्रावर ओळख, वाशीमध्ये भेटायला बोलावले; 16 वर्षाच्या मुलीवर कारमध्येच...
13
Kojagiri Purnima 2025:कोजागरी पौर्णिमेला चंद्र प्रकाश अंगावर घ्यावा असे म्हणतात; का ते माहितीय?
14
मुंबई-पुण्यात घरांच्या विक्रीत १७% घट; 'या' कारणांमुळे ग्राहकांनी फिरवली पाठ; किमती कमी होणार का?
15
‘आयुष्मान भारत’ योजना बंद पडली? नागपूरच्या रुग्णालयांमध्ये उघडकीस आले धक्कादायक वास्तव; रुग्णांना सेवा नाकारल्या
16
Video - "देवाने हे नियम बनवले नाहीत..."; शॉर्ट्स घालून महिलेने मंदिरात प्रवेश केल्याने मोठा गोंधळ
17
VIDEO: 'पॉवर हिटिंग'! ३ वर्षांच्या चिमुरड्याची बॅटिंग पाहून तुम्हीही म्हणाल- What a Shot!
18
मृत्यूचे कुंड : १०० हून अधिक लोकांना गायब करणारी रहस्यमयी विहीर! ४० मीटर लांब, शास्त्रज्ञांनाही उलगडेना...
19
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
20
कोजागरी शरद पौर्णिमा २०२५: पंचकाची अशुभ छाया अन् अमंगल काळ, शुभ मुहूर्त कधी? लक्ष्मी लाभेल!

बीडमध्ये ११२६९ शेतकरी पात्र तरीही शेततळ््यांचे उद्दिष्ट अपूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 23:21 IST

बीड जिल्ह्यातील सर्व तालुक्यात शेततळ्यांची कामे सुरू आहे. जिल्ह्यात यावर्षी ६५०० शेततळे करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले होते. त्यासाठी शेतक-यांकडून १२ हजार ४९९ अर्ज देखील आले. त्यापैकी ११ हजार २६९ शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरले आहेत.

ठळक मुद्देदुष्काळ निवारणासाठी शेततळे : शेतक-यांनीही पाठपुरावा करावा

प्रभात बुडूख।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेअंतर्गत गतवर्षी ६ हजार ५०० शेततळे जिल्ह्यात होणे आवश्यक होते. मात्र हे उद्दिष्ट अद्याप पूर्ण होऊ शकले नाही. जिल्ह्यातील दुष्काळ निवारण व्हावे व शेतीला मुबलक पाणी मिळून रबी आणि खरीप हंगामातील दोन्ही पिके शेतक-यांना घेता यावीत, हा योजनेचा हेतू आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यात शेततळ्यांची कामे सुरू आहे. जिल्ह्यात यावर्षी ६५०० शेततळे करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले होते. त्यासाठी शेतक-यांकडून १२ हजार ४९९ अर्ज देखील आले. त्यापैकी ११ हजार २६९ शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरले आहेत.

मात्र त्यापैकी फक्त ४१०५ शेतकरी या योजनेचे लाभार्थी झाले. तसेच ३५५ शेततळ््याचे काम प्रगतीपथावर आहे. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत ४४६० शेततळे झाल्याचे चित्र आहे. ‘मागेल त्याला शेततळे’ हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कोण कमी पडले हा प्रश्न आहे. दुष्काळी जिल्हा ही ओळख पुसण्यासाठी ही योजना उपयोगी आहे. मात्र यासाठी प्रशासनाने आणि शेतक-यांनी योग्य तो पाठपुरावा करणे गरजेचे आहे. शेततळ्याविषयी जनजागृती शासनाकडून केली जाते. तरी देखील जिल्ह्यात शेततळ्याचे उद्दिष्ट पूर्ण होत नाही. योजनेचा लाभ घेण्यासाठी आॅनलाईन प्रणाली वापरावी लागते. त्यामुळे याचा पाठपुरावा शेतकºयांनी वेळो-वेळी केला नाही तर त्यांचे नाव या योजनेमधून वगळण्यात येते हेही एक कारण या योजनेची उद्दिष्टपूर्ती न होण्याचे आहे.

शेतकरी प्रशासनात योजनेविषयी उदासीनतामागेल त्याला शेततळे योजनेबाबत पुरेशी व समर्पक माहिती देण्यासाठी गावपातळीवरील कर्मचारी, अधिकारी एकतर उपलब्ध होत नाहीत. तर भेट झाल्यास शेत-यांना व्यवस्थित माहिती दिली जात नाही. कागदपत्रातील किरकोळ त्रुटी काढून प्रस्ताव नाकारले जातात. दलालामार्फत शेततळ्याचे काम तत्परतेने होते. शेतकºयांना गावातील सरपंच ग्रामसेवक, तलाठी यांनी शेतक-यांना मदत करण्याची आवश्यकता आहे. तसेच शेततळे घेण्यासाठी शेतक-यांनी वेळोवेळी पाठपुरावा करणे आवश्यक.जिल्ह्यातील कृषी उत्पादन वाढवण्यासाठी व दुष्काळी जिल्हा ही ओळख पुसण्यासाठी जिल्ह्यात अशा योजना १०० टक्के राबवणे आवश्यक आहे. ‘मागेल त्याला शेततळे’ योजना उत्पादन वाढीसाठी महत्त्वाची बारमाही पाणी उपलब्धतेमुळे शेतीमध्ये नवे प्रयोग करता येतील