बीड : शेतातील कांद्यांच्या रोपावर तणनाशक कोणी फवारले अशी भांडणाची कुरापत काढून विजया व त्यांचे पती विठ्ठल पोकळे यांना शिवीगाळ करीत काठीने मारहाण केल्याची घटना तालुक्यातील पोत्रा येथे २६ डिसेंबर रोजी घडली. याप्रकरणी बाबासाहेब पोकळे, आशाबाई पोकळे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे.
तीन हजार लिटर डिझेलची चोरी
केज : बांधकाम सुरू असलेल्या पेट्रोल पंपावरील डिझेल टाकीतून तीन हजार लिटर डिझेल चोरून नेल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध केज ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. २४ ते २५ डिसेंबर दरम्यान धारूर रोडवरील नितीन नेहरकर यांच्या पेट्रोल पंपावर ही घटना घडली. दोन लाख ३३ हजार २३१ रुपयांचे डिझेल चोरीस गेले आहे.
चिंचोलीमाळीत
घरावर दगडफेक
केज : गैरकायद्याची मंडळी जमवून सर्जेराव मगर व त्यांच्या पत्नीस जिवे मारण्याची धमकी देत घरावर दगडफेक केल्याप्रकरणी केज ठाण्यात विठ्ठल मगर, राहूल मगर, अमोल मगर, सुरेखा मगर, ऋषीकेश मगर, अविनाश मगर, वैशाली मगर, उर्मिला मगर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे. तर विठ्ठल मगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ??? जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.