शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बीड गोदामातील अपहार ८१ लाखांपेक्षाही वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 01:02 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : बीडच्या शासकीय धान्य गोदामातील ८१ लाख रुपयांच्या मालाचा अपहार करुन भ्रष्टाचाराचे प्रकरण समोर आले ...

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : बीडच्या शासकीय धान्य गोदामातील ८१ लाख रुपयांच्या मालाचा अपहार करुन भ्रष्टाचाराचे प्रकरण समोर आले होते. याप्रकरणी बीड ग्रामीण ठाण्यात गोदाम व्यवस्थापक दिलीप भडके याच्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. मात्र, हा अपहार ८१ लाखांचा नसून याचा आकडा वाढल्याची नवीन माहिती समोर आली आहे.या प्रकरणाचा तपास करताना, पोलीसांना व पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांना नेमका किती माल होता व किती मालाचा अपहार झाला याबबत संभ्रमाचे वातावरण होते. मात्र १ एप्रिल रोजी पुरवठा विभागाच्या राज्यस्तरीय पथकानेच तब्बल ६९ लाखांचा घोटाळा उघडकीस आणला होता. यावेळी देण्यात आलेल्या अहवालामध्ये रेशनच्या गव्हाचा उल्लेख नव्हता. त्यानंतर मे २०१९ मध्ये तहसीलदारांनी केलेल्या पंचनाम्यात ६३ लाख रुपये किमतीच्या गव्हाचा देखील अपहार केल्याचे समोर आले होते. त्यामुळे अपहाराचा आकडा वाढणार असून हा अपहार १ कोटीपेक्षा जास्त रुपयांचा असल्याची सूत्रांची माहिती आहे. मात्र, या प्रकरणाची योग्य चौकशी झाल्याशिवाय नेमका किती अपहार झाला आहे याचे गुढ उकलणार आहे.यापुर्वी पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांकडून लाच स्वीकारताना अपर जिल्हाधिकारी कांबळे यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने पकडले होते. त्यानंतर देखील अपहार केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा नोंद करण्यात आला होता. तसेच त्यांच्याकडून अपहार केलेल्या मालाच्या रखमेची वसूली देखील करण्यात येणार आहे. त्यानंतर २४ मे रोजी तहसीलदारांनी गोदामाच्या पंचनामा केला आणि त्यात इतके धान्य कमी असल्याचे समोर आल्यांनंतर तब्बल दीड महिन्यांनी गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु गोदामाची पुरवठा विभागाच्या राज्यस्तरीय पथकाने, जे गोदाम तपासणीतील तज्ञ आहेत त्यांनी १ एप्रिल रोजी तपासणी केली होती. यात गहू वगळता तांदूळ, साखर आणि डाळी असे तब्बल ६९ लाखाचे धान्य कमी आढळून आले होते. त्याची वसुली करण्याची शिफारस पथकाने केली होती, त्यानुसार गोदाम व्यवस्थापकासह तहसीलदार, नायब तहसीलदार यांना देखील नोटिसा देखील बजावण्यात आल्या होत्या.तहसीलदारांनी बीड धान्य गोदाम ताब्यात घेतला होता व मे महिन्यात गोदाम तपासणी करुन पंचनामा केला होता. यावेळी ८१ लाखांचे धान्य कमी असल्याचे समोर आले होते. विशेष म्हणजे यात तब्बल ६३ लाखांचा गहू कमी दाखविण्यात आला आहे. परंतु पथकाने केलेल्या तपासणीमध्ये व तहसीलदार अविनाश शिंगटे यांनी केलेल्या तपासणीमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत असल्याचे दिसून येत आहे. कारण एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला गहू वगळता झालेला अपहार ६९ लाखांचा होता, तर मे महिन्यात ६३ लाखांचा गहू गोदामात नसताना देखील आकडा अहवालामध्ये केवळ ८१ लाखाचा आहे. यावरुन हा धान्याचा अपहार ८१ लाखाचा नसून त्याची किंमत १ कोटी रुपयांच्या पुढे जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचारfoodअन्न