शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये स्कूल रिक्षाचालकांचा आडमुठेपणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 01:15 IST

क्षमतेपेक्षा अधिक मुले बसवून धोकादायक प्रवासी वाहतूक करणाºया स्कूल रिक्षांवर कारवाईसाठी वाहतूक शाखेचे कर्मचारी गेले. एक दोन रिक्षा पकडल्यानंतर ही माहिती वाºयासारखी पसरली आणि इतर रिक्षावाचालकांनी मुलांना रस्त्यात सोडूनच पळ काढला. दुपारनंतर त्यांनी संप पुकारला. यामुळे मुलांचे मोठे हाल झाले.

ठळक मुद्देकारवाईच्या भीतीने लहान मुलांना रस्त्यात सोडून पसार

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : क्षमतेपेक्षा अधिक मुले बसवून धोकादायक प्रवासी वाहतूक करणाºया स्कूल रिक्षांवर कारवाईसाठी वाहतूक शाखेचे कर्मचारी गेले. एक दोन रिक्षा पकडल्यानंतर ही माहिती वाºयासारखी पसरली आणि इतर रिक्षावाचालकांनी मुलांना रस्त्यात सोडूनच पळ काढला. दुपारनंतर त्यांनी संप पुकारला. यामुळे मुलांचे मोठे हाल झाले. नियमांचे उल्लंघन करून वाहतूक करणाºया या रिक्षाचालकांच्या आडमुठेपणामुळे सर्वसामान्यांमध्ये तीव्र संताप आहे.

मागील काही दिवसांपासून बीड शहरासह जिल्ह्यात शाळकरी मुलांची रिक्षांतून क्षमतेपेक्षा अधिक बसवून वाहतूक केली जात आहे. यामुळे अपघाताच्या घटनाही घडल्या आहेत. तसेच मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण होतो. असे असतानाही आरटीओ व शहर वाहतूक शाखा पोलिसांकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याने संताप व्यक्त होत आहे. यापूर्वी एक दिवस कारवाई करून वाहतूक शाखेने दंड वसूल केला होता.

त्यानंतर पुन्हा जैसे थे परिस्थिती झाली होती. मंगळवारी पुन्हा कारवाईची मोहिम हाती घेतली. एक-दोन रिक्षा पकडल्यानंतर सर्वांनी एकमेकांना फोनाफोनी करून कारवाईची माहिती दिली. त्यानंतर सर्वांनीच मुलांना सोडून पळ काढला. यामुळे मुलांचे हाल झाले. पालकांनीच आपल्या पाल्यांना शाळेत सोडण्याबरोबरच जाऊन आणले. दरम्यान, नियमांचे पालन करणा-या रिक्षा चालकांना याचा फटका सहन करावा लागत आहे.

जे नियमांचे उल्लंघण करून मुलांची वाहतूक करतात, त्यांच्यावर कारवाई होत असेल, तर योग्य असेही संघटनेने कळविले आहे. सर्व स्कूल रिक्षांनी नियमांचे पालन करून सुरक्षिततेबद्दल काळजी घ्यावी, अशी मागणी आहे.

  • रिक्षा संघटनेकडून बेमुदत संपाचा इशारा

मंगळवारी वाहतूक शाखेने कारवाईची मोहीम हाती घेतल्यानंतर जिनियस स्कूल आॅटो युनियनतर्फे शाळेच्या रिक्षांचा बेमुदत संप पुकारल्याचे पत्रक काढले.जिल्हाधिका-यांना भेटून १४ डिसेंबर रोजी धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे यामध्ये कळविले आहे. आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन संघटनेचे अध्यक्ष बाबूभाई आतार, उपाध्यक्ष पांडुरंग जाधव, सचिव अशोक शेटे यांनी केले आहे.