शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

बीड जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या वादाला कलाटणी; चौघांची माघार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 16:49 IST

जिल्हा रुग्णालयातील ११ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपसंचालकांना गुरूवारी तक्रार केली होती.

बीड : जिल्हा शल्य चिकित्सक व अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याविरोधात उपसंचालकांकडे तक्रार करणाऱ्या ११  पैकी ४ डॉक्टरांनी माघार घेतल्याचे समजते. त्यामुळे या प्रकरणाला कलाटणी मिळाली आहे. सोमवारी यावर निर्णय होणार असल्याचेही विश्वसनिय सूत्रांकडून समजते.

अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, वैद्यकीय अधिकाऱ्यांमध्ये तू तू-मै मै

आपल्याला रजा दिली जात नाही, जास्त ड्यूटी लावल्या जातात, मनमानी कारभार चालविला जातो, असे आरोप करीत जिल्हा रुग्णालयातील ११ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात व अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुखदेव राठोड यांच्याविरोधात उपसंचालकांना गुरूवारी तक्रार केली होती. त्यानंतर शुक्रवारी सकाळी डॉ.राठोड व वैद्यकीय अधिकारी डॉ.महादेव चिंचोले यांच्यात रजेच्या कारणावरून ‘तू तू-मैं मैं’ झाली होती. त्यामुळे हे प्रकरण वाढण्याची शक्यता वर्तविली जात होती. अशातच शनिवारी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

तक्रारीवर स्वाक्षऱ्या असलेल्या ११  पैकी ४ डॉक्टरांनी यातून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्याला अंधारात ठेवून तक्रारीवर स्वाक्षऱ्या घेतल्याचे त्यांचे म्हणने आहे. मात्र, त्यांनी अद्याप यावर लेखी स्वरूपात प्रशासनाला कळविलेले नाही. लेखी स्वरूपात नसल्याने त्या चार डॉक्टरांची नावे समोर आलेले नाहीत. दरम्यान, ज्या डॉक्टरांवर अन्याय झाला आहे, त्यांचे म्हणने सोमवारी जिल्हा शल्य चिकित्सक ऐकूण घेणार असल्याचे विश्वसनिय सूत्रांकडून समजते. तसा संदेशही संबंधित डॉक्टरांना गेल्याचेही कळते. याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांच्याशी संपर्क केला. मात्र, त्यांचा भ्रमणध्वणी बंद होता. 

वाद वाढणार कि मिटणार?जिल्हा रुग्णालयात मागील चार दिवसांपासून डॉक्टरांमध्ये चांगलेच वाद होताना दिसून येत आहेत. याच वादावर आता सोमवारी चर्चा होणार आहे. या चर्चेत वाद वाढणार कि मिटणार? हे सोमवारी दुपारपर्यंत समजेल. यात तक्रारदार डॉक्टरही उपस्थित राहतील कि नाही, यातही शंका व्यक्त होत आहे.

टॅग्स :BeedबीडBeed civil hospitalजिल्हा रुग्णालय बीडdoctorडॉक्टर