शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

बीडमध्ये बारावीचे कॉलेजकुमार बनले दरोडेखोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 00:38 IST

राष्ट्रीय महामार्गावर रात्रीच्यावेळी थांबलेल्या वाहनांवर ‘अटॅक’ करीत चालकांना, प्रवाशांना चाकूचा धाक दाखवून लाखो रूपये लुटणा-या टोळीचा बीड पोलिसांनी पर्दाफाश केला. पोलिसांनी चौकशी केली असता हे सर्व आरोपी अल्पवयीन असून बारावीच्या वर्गात शिक्षण घेणारे असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. चित्रपटाला लाजवेल असा सापळा लावून बीड पोलिसांनी ‘लाईव्ह’ कारवाई केली.

ठळक मुद्देवाटमारी करणा-या टोळीचा पर्दाफाशस्थानिक गुन्हे शाखा, दरोडा प्रतिबंधक, गेवराई पोलिसांची संयुक्त कारवाई

बीड : राष्ट्रीय महामार्गावर रात्रीच्यावेळी थांबलेल्या वाहनांवर ‘अटॅक’ करीत चालकांना, प्रवाशांना चाकूचा धाक दाखवून लाखो रूपये लुटणा-या टोळीचा बीड पोलिसांनी पर्दाफाश केला. पोलिसांनी चौकशी केली असता हे सर्व आरोपी अल्पवयीन असून बारावीच्या वर्गात शिक्षण घेणारे असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. चित्रपटाला लाजवेल असा सापळा लावून बीड पोलिसांनी ‘लाईव्ह’ कारवाई केली.

बाबूराव काटकरसह इतर तिघे अल्पवयीन मित्र आहेत. चौघेही गेवराई तालुक्यातीलच रहिवासी आहेत. बारावीचे शिक्षण घेण्यासाठी ते गेवराईत एकत्र आले. एकत्रच क्लास लावले. येथे त्यांची घट्ट मैत्री झाली. काही दिवस अभ्यास केला. परंतु एका अल्पवयीन आरोपीच्या डोक्यात वाटमारीची संकल्पना आली. एकट्याला हे शक्य नसल्याने त्याने इतरांची मदत घेतली. पंधरा दिवसांपूर्वी त्यांनी खºया ‘अभ्यासाला’ सुरूवात केली.

गेवराई तालुक्यातून जाणाºया राष्ट्रीय महामार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते. रात्रीच्या वेळी काही वाहनधारक रस्त्याच्या बाजूला वाहने उभी करून आराम करतात. हीच संधी साधून हे चौघे लोखंडी टॉमी व इतर हत्यारांचा धाक दाखवून या वाहनधारकांना मारहाण करून लाखोंचा ऐवज लंपास करीत होते. एका पाठोपाठ एक वाटमा-या होत असल्याने वाहनधारकांत दहशत निर्माण झाली होती.तपास लावण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते.

पोलिसांनी सुरूवातीला रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासले. परंतु यामध्ये त्यांना कोणावरच संशय आला नाही. हे कोणी तरी नवीन असावेत, असा अंदाज त्यांचा होता. त्याप्रमाणे त्यांनी सापळा लावला आणि यामध्ये गुन्हेगार अडकले. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपअधीक्षक अर्जून भोसले, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे, गेवराईचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, दरोडाचे सपोनि श्रीकांत उबाळे, दिलीप तेजनकर, रवी सानप, सचिन पुंडगे, फौजदार रामकृष्ण सागडे, मालुसरे, पवार, अंकुश वरपे, मिलींद शिंदे, रेवणनाथ गंगावणेसह एलएसीबी, एडीएस आदींनी केली.तीन दिवस लावला होता  सापळाबीड पोलीस मागील तीन दिवसांपासून या लुटारूंच्या मागावर होते. वेगवेगळी ‘डमी’ वाहने उभा करून त्यांनी त्यात पोलीस कर्मचारी ठेवले. दोन दिवस त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले. परंतु त्यांनी हार मानली नाही. सोमवारी रात्री नागझरीजवळ तीन कर्मचारी झोपवून टेम्पो रस्त्यात लावला. रात्री दोन वाजेच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या तिघांनी दरवाजा उघडून पैशांची मागणी केली. याचवेळी आतील एका कर्मचा-याने त्याला पकडले. एवढ्यात पाठीमागे झोपलेल्या दोन जवानांनी त्याच्यावर झडप घातली. टेम्पोसमोर दुचाकीवर असणाºया दोघांना पोलीस असल्याचा संशय येताच त्यांनी दुचाकी सोडून अंधाराचा फायदा घेत बाजूच्या उसातून पळ काढला.पालकांच्या विश्वासाला तडाआई-वडिलांकडून आपल्या पाल्याला मोठ्या अपेक्षा असतात. आपला पाल्य चांगला अधिकारी, व्यावसायिक अथवा प्रतिष्ठित व्यक्ती बनावा, अशी अपेक्षा सर्वांनाच असते. त्यासाठी ते जिवाचे रान करून, पोटाला चिमटा घेत पाल्याला शिक्षणासाठी शहराच्या ठिकाणी टाकतात. तिथे महागडे ‘क्लासेस’ लावले जातात. यासाठी हजारोंचा खर्च केला जातो. परंतु मुले याचा गैरफायदा कसा घेतात? याचे ज्वलंत उदाहरण या कारवाईने समोर आले आहे. पालकांनी आपल्या पाल्यांकडे लक्ष देण्याची गरज आहे.

आठवड्यातच तीन जिल्ह्यात धुमाकूळया टोळीने बीडसह अहमनगर, जालना जिल्ह्यात धुमाकूळ घातला होता. दिवसा झोपायचे आणि रात्री वाटमारी करायची, असे त्यांचे नियोजन होते. आठवड्यापूर्वीच त्यांनी गुन्हे करण्यास सुरूवात केली होती. तब्बल १० गुन्हे त्यांनी केल्याचे कबूल केले आहे. वास्तवात केवळ तीनच गुन्ह्यांची नोंद आहे.

अनुभव कामालाएलसीबीचे तत्कालीन व आताचे गेवराई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, विद्यमान पोनि घनश्याम पाळवदे यांचा अनुभव या कारवाईत कामाला आला. त्यामुळे या टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले.

श्रीधर, कलुबर्मेंकडून आढावाशिवाजीनगर व धारूर ठाण्यातून आरोपीचे पलायण, यामुळे बीड पोलीस चर्चेत होते. अशातच वाटमाºया होत असल्याने पोलिसांना तपासाचे आव्हान होते. परंतु पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांनी आपल्या चमूला योग्य वेळी योग्य मार्गदर्शन केल्याने या टोळीचा पर्दाफाश करण्यात लवकर यश आले. तासातासाला या अधिकाºयांकडून आढावा घेतला जात होता.