शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

घरकुल मंजुरीसाठी बीडीओने पैसे मागितले; भर कार्यक्रमात महिलेचा आरोप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 17:35 IST

जिल्हापरिषद मुलांची शाळा येथे 'शिक्षणाची वारी' या तालुकास्तरीय कार्यक्रमाचे दुपारी उद्घाटन झाले. यानंतर कार्यक्रम सुरु असतानाच एका महिलेने गटविकास अधिकाऱ्यांनी घरकुल मंजुरीसाठी पैसे मागितल्याचा आरोप करत त्यांचावर टेबलवरील हार भिरकावला.

माजलगाव (बीड ) : जिल्हापरिषद मुलांची शाळा येथे 'शिक्षणाची वारी' या तालुकास्तरीय कार्यक्रमाचे दुपारी उद्घाटन झाले. यानंतर कार्यक्रम सुरु असतानाच एका महिलेने गटविकास अधिकाऱ्यांनी घरकुल मंजुरीसाठी पैसे मागितल्याचा आरोप करत त्यांचावर टेबलवरील हार भिरकावला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे मात्र कार्यक्रमात चांगलाच गोधळ पाहायला मिळाला.  

शाळा व्यवस्थापन समितीमधील सदस्यांना त्यांच्या अधिकार व कर्तव्याची माहिती व्हावी या हेतुने तालुका स्तरावर शिक्षणाची वारी हा एकदिवसीय उपक्रम राबविण्यात येत आहे. या निमित्ताने आज जिल्हा परिषद मुलांची शाळा येथे प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. यात 25 शाळामधील उपक्रमांचे प्रदर्शन होते. तसेच यासाठी तालुक्यातील सर्व शाळांच्या शालेय समितीच्या सदस्यांना निमंत्रित करण्यात आले होते. दुपारी कार्यक्रमाचे उदघाटन गटविकास अधिकारी बी.टी. चव्हाण, गटशिक्षणाधिकारी बी.के. नांदुरकर, जयदत्त नरवडे यांच्या हस्ते झाले. 

उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर नरवडे यांचे भाषण सुरु असतांना अचानक देवखेडा येथील अरुणा श्रीरंग वाघमारे या स्टेजजवळ आल्या. काही कळायच्या आत त्यांनी गटविकास अधिकारी चव्हाण यांच्यासमोर जात, 'मी पैसे देऊनही तुम्ही माझे रमाई घरकुल योजनेतुन घर मंजूर का केले नाही, तुम्हाला आणखी १० हजार कसे देऊ.' असा जाब विचारत गोंधळ घातला. चव्हाण यांनी याकडे दुर्लक्ष करताच वाघमारे यांनी संतप्त होत त्यांच्यावर टेबलवरील हार भिरकावला. यानंतर काही शिक्षिकांनी व नरवडे यांनी स्टेजकडे धाव घेत वाघमारे यांना समजावत बाजूला घेत शांत केले. झालेल्या प्रकारामुळे कार्यक्रमाचा पुरता बट्ट्याबोळ झाला. प्रदर्शनासाठी आलेली विद्यार्थीही यामुळे चांगलीच घाबरून गेली. 

पैस्यांची केली मागणी अरुणा वाघमारे म्हणाल्या कि, गटविकास अधिकारी चव्हाण यांना घरकुल मंजुरीसाठी सुरुवातीला साडेचार हजार रुपये दिले त्यानंतर पुन्हा दीड हजार रुपये दिले.यावरही त्यांनी आणखी दहा हजार रुपयाची मागणी केली. यासाठी मी असमर्थता दर्शवतात त्यांनी मला आधी मोदीच्या खात्यात पैसे भरावे लागतात मगच तुमचे काम होईल असे म्हटले यामुळे मी संतप्त झाल्याची प्रतिक्रिया दिली. 

शिक्षकात झाली फिल्मीस्टाईल हाणामारीयाच वेळी दारु प्यायला पैसे का दिले नाही म्हणुन दोन शिक्षकांमध्ये फिल्मीस्टाईल हाणामारी व शिवीगाळीचा प्रकार भर कार्यक्रमात तब्बल 2 हजार लोकांसमोर झाला. 

कागदपत्रे दिली नाहीत सदर महिलेने ग्रामसभेचा ठराव इतर कागदपत्रे कार्यालयाला दिलेली नाहीत, त्यामुळे त्यांना घरकुल देण्याचा प्रश्नच नाही. घरकुल कोणाला द्यायचे हा सर्व अधिकार ग्रामसभेला आहे. - बी. टी. चव्हाण, गटविकास अधिकारी 

माहिती घेत आहे शिक्षकांमध्ये झालेल्या भांडणाची मला माहिती नाही. याबाबत माहिती घेऊन संबंधीत शिक्षकांवर कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविण्यात येईल. -  बी.के.नांदुरकर, गटशिक्षणाधिकारी 

टॅग्स :educationशैक्षणिकEducation Sectorशिक्षण क्षेत्रBeedबीड