शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

राज्यातील संशोधक विद्यार्थ्यांचे थेट धनंजय मुंडेंच्या परळीत उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2021 12:44 IST

बार्टीतर्फे देण्यात येत असलेली अधिछात्रवृत्ती- २०१८ एमफिल ते पीएचडी पाच वर्षांसाठी नियमित करण्याची आंदोलकांची मागणी

परळी ( बीड ) : बार्टीतर्फे ( BARTI ) देण्यात येत असलेली अधिछात्रवृत्ती- २०१८ एमफिल ते पीएचडी पाच वर्षांसाठी नियमित करण्यात यावी, या मागणीकरिता  राज्यातील विविध विद्यापीठातील संशोधक विद्यार्थी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे ( Dhananjay Munde ) यांचा विधानसभा मतदारसंघ परळी वैजनाथ येथे शुक्रवारपासून साखळी उपोषण करत आहेत. याबद्दल सातत्याने मंत्री मुंडे यांच्याकडे पाठपुरावा करूनही न्याय मिळत नसल्याचा संताप आंदोलक विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे.

विद्यापीठ अनुदान आयोग भारत सरकारच्या नियमाप्रमाणे एम.फिल. करणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांना सलग पाच वर्षे पीएच. डी. पर्यंत फेलोशिप देण्यात येते. परंतु डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे (बार्टी) च्या माध्यमातुन देण्यात येणारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती (BANRF – २०१८) मात्र एम.फिल. या अभ्यासक्रमासाठी दोनच वर्षे दिली जात आहे. पीएच.डी. पर्यंत सलग अधिछात्रवृत्ती देण्यात येत नसल्याने संशोधक विद्यार्थ्यांना अनेक अडचणीला सामोरे जावे लागेल. यामुळे अनुसूचित जातीच्या संशोधन अधिछात्रवृत्ती (BANRF – २०१८) धारक विद्यार्थ्यांवर अन्याय होत असून अनेक जण पीएचडी संशोधनापासून वंचित राहत आहेत. ही त्रुटी दूर करावी यासाठी बार्टी तसेच सामाजिक न्याय मंत्र्यांकडे सातत्याने संशोधन अधिछात्रवृत्ती (BANRF – २०१८) धारक विद्यार्थी पाठपुरावा करत आहेत. परंतु, मागणी मान्य होत नसल्याने हे संशोधक विद्यार्थी थेट सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या मतदार संघातील परळी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारपासून साखळी उपोषण करत आहेत. मागणी पूर्ण होईपर्यंत साखळी उपोषण सुरूच राहील, असा ठाम निर्धार आंदोलक विद्यार्थ्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. 

दरम्यान, आंदोलक विद्यार्थ्यांनी मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यास दिले आहे. त्यांनी पुढील कारवाईसाठी निवेदन संबंधित विभागास तत्काळ पाठविण्यात येत असल्याचे सांगितले आहे. या आंदोलनात नारायण खरात, अक्षय जाधव, अमोल घुगे, भगवान चोपडे, भिमराव वाघमारे, संदीप तुपसमुद्रे, श्रद्धा सिरसाट, दीक्षा ढगे, सारिका दळवी, अनिता शिंदे, उषा इंगळे, सविता गंगावणे, सुनील वाघमारे, मीनाक्षी वाकेकर, छाया सौंदरमल, अरुणा सपकाळ, अमोल शिंदे, सिद्धार्थ कांबळे, रामेश्वर गोरे, अमोल चोपडे, प्रमिता भोजने, विशाखा रगडे, सिद्धांत सोनवणे, प्रीतम मोरे यांच्यासह अनेक संशोधक विद्यार्थी सहभागी झाले आहेत. 

टॅग्स :BeedबीडStudentविद्यार्थीDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद