शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

बापरे...! गायीच्या पोटात वासरू अन् ४० किलो प्लास्टिक, कोंडवाड्यात गर्भवती गायीचा मृत्यू

By सोमनाथ खताळ | Updated: August 5, 2024 15:55 IST

गायीचा मृत्यू प्लास्टिकमुळेच झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या मृत्यूने प्लाास्टिकचा मुद्दा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

बीड : बीड शहरात मोकाट जनावरांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. याच जनावरांना पकडून नगर पालिकेच्या पथकाने कोंडवाड्यात ठेवले. यातच पाच महिन्यांची गर्भवती असलेली गाय मृत झाली. तिचे शवविच्छेदन केले असता तिच्या पोटात वासरू अन् तब्बल ४० किलो प्लास्टिक निघाले आहे. हा प्रकार रविवारी समोर आला. गायीचा मृत्यू प्लास्टिकमुळेच झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या मृत्यूने प्लाास्टिकचा मुद्दा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

बीड शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी २५ जुलै २०२४ पासून मुख्याधिकारी नीता अंधारे यांनी विशेष पथक नियुक्त केले आहे. या पथकाने शहरात फिरणाऱ्या जवळपास ५० मोकाट जनावरांना पकडून खासबाग व नेहरू नगर भागातील कोंडवाड्यात ठेवले. कोंडवाड्यात असतानाच एका गायीचा मृत्यू झाला. पथकाने ही माहिती बीड शहर पोलिसांना कळवली. पोलिसांनी पशुधन विकास अधिकाऱ्यांना पत्र दिल्यावर तिचे कोंडवाडा परिसरात शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी ही गाय जवळपास पाच महिन्यांची गर्भवती असल्याचे समजले. तसेच, तिच्या पाेटात तब्बल ४० किलो प्लास्टिक निघाले. डॉक्टरांनी सर्व सॅम्पल घेऊन छत्रपती संभाजीनगरच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले. त्याचा अहवाल आल्यावरच मृत्यूचे कारण अधिकृतरीत्या समोर येणार आहे, परंतु प्राथमिकदृष्ट्या प्लास्टिक पोटात राहिल्यानेच मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

पाेटात प्लास्टिक कसे जाते?शहरात मोकाट जनावरांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यांना खाण्यासाठी चारा नाही. त्यामुळे ते कचरा कुंडी व रस्त्यावर पडलेले पदार्थ खातात. अनेकदा काही लोक घरातील कचरा, अन्न पदार्थ व इतर साहित्य हे प्लास्टिक कॅरीबॅगमध्ये गुंडाळून फेकतात. जनावरांना ते तोंडाने वेगवेगळे करता येत नसल्याने ते प्लास्टिकसह खातात. यामुळे ते पोटात जाते. ते बाहेर येत नसल्याने विविध आजारांना निमंत्रण मिळून जनावरांचा मृत्यू होताे. यापूर्वीही तीन ते चार वर्षांपूर्वी बीड शहरातील शाहूनगर भागातील गायीचा प्लास्टिकमुळेच मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून समोर आले होते.

नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेपोलिसांचे पत्र मिळाल्यावर कोंडवाड्यात जाऊन गायीचे शवविच्छेदन केले. यामध्ये ती जवळपास पाच महिन्यांची गर्भवती असल्याचे समजले. तसेच, तिच्या पोटात ३० ते ४० किलो प्लास्टिक निघाले आहे. सर्व सॅम्पल घेऊन छत्रपती संभाजीनगरच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले आहेत.- डॉ. विजय चौरे, पशुधन विकास अधिकारी, बीड.

एका गायीचा मृत्यू झालामोकाट गुरे पकडण्यासाठी २५ जुलैपासून माझ्यासह पाच जणांचे पथक नियुक्त केले आहे. आम्ही ५० जनावरे पकडून कोंडवाड्यात ठेवली होती. यातच एका गायीचा मृत्यू झाला. शवविच्छेदन करून नाळवंडी रोड परिसर तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. इतर जनावरे हे पावसामुळे निवाऱ्याची सोय नसल्याने मालकांकडून हमीपत्र घेऊन सोडण्यात आले.- मुन्ना गायकवाड, पथकप्रमुख, नगर पालिका, बीड.

टॅग्स :Beedबीडcowगाय