शहरं
Join us  
Trending Stories
1
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
2
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
3
"काँग्रेस पराभव लपवण्यासाठी खोटे दावे करतेय"; मतचोरीवरून भाजपाचा राहुल गांधींवर हल्लाबोल
4
२.४० कोटींपैकी केवळ ८० लाख लाडक्या बहिणींचे eKYC पूर्ण, १८ नोव्हेंबरपर्यंतची मुदत; पुढे काय?
5
राहुल गांधींनी जिला 'ब्राझिलियन मॉडेल' म्हटलं, ती निघाली 'पिंकी'? काँग्रेसच्या मत चोरीच्या दाव्यानंतर, चकित करणारा खुलास!
6
इंदुरीकर यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत; एवढा खर्च कशासाठी?, महाराज म्हणाले...
7
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
8
"रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान
9
Astro Tips: तुमच्या नशिबात प्रेम की धोका, हे कसे ओळखाल? ज्योतिष शास्त्र काय सांगते पाहा!
10
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
11
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
12
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
13
Sensex Will Go Above 1 Lakh: वाईट काळ सरला..! पुढील वर्षी सेन्सेक्स गाठणार १ लाखांचा टप्पा, कोण म्हणालं असं?
14
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
15
प्रियकराने केली शिवीगाळ, वडिलांचा अपमान सहन न झालेल्या २० वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल
16
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
17
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
18
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
19
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
20
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ

ज्येष्ठांना सुलभ सेवेसाठी बॅँक तत्पर राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 00:37 IST

बॅँकेत येणाऱ्या पेन्शनर व ज्येष्ठ नागरिकांकडे विशेष लक्ष देऊन त्यांना सुलभ सेवा कशा मिळतील यावर आणखी भर देणार आहोत. बॅँकेत आवश्यक यंत्रणा तसेच मनुष्यबळ वाढविणार असल्याचे प्रतिपादन एसबीआय आरबीओ बीडचे एजीएम संजय चामणीकर यांनी केले.

ठळक मुद्देपेन्शनर्स डे : एजीएम संजय चामणीकर यांचे प्रतिपादन, पेन्शनर्स असोसिएशनतर्फे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी २५ हजारांची मदत

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : बॅँकेत येणाऱ्या पेन्शनर व ज्येष्ठ नागरिकांकडे विशेष लक्ष देऊन त्यांना सुलभ सेवा कशा मिळतील यावर आणखी भर देणार आहोत. बॅँकेत आवश्यक यंत्रणा तसेच मनुष्यबळ वाढविणार असल्याचे प्रतिपादन एसबीआय आरबीओ बीडचे एजीएम संजय चामणीकर यांनी केले.पेन्शनर्स अ‍ॅन्ड सिनिअर सिटीजन्स असोसिएशन व स्टेट बॅँक आॅफ इंडियाच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी पेन्शनर्स डे कार्यक्रमात चामणीकर बोलत होते. व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी धनवंतकुमार माळी, राजुरी वेस एसबीआयचे चीफ मॅनेजर बी. श्रीनिवास, जिल्हा कोषागार अधिकारी डॉ. श्रीरंग भुतडा, डॉ. अमोल लहाने आदी उपस्थित होते. अध्यक्षस्थानी मराठवाडा पेन्शनर्स असोसिएश्नचे कार्याध्यक्ष भास्करराव सरदेशमुख उपस्थित होते.यावेळी धनवंतकुमार माळी म्हणाले, जिल्हा परिषदेच्या सेवानिवृत्तांसाठी पेन्शन सेल सुरु करण्यात येणार असून एक तारखेला पेन्शन देण्याचा प्रयत्न करु अशी ग्वाही दिली. इतर प्रश्न पेन्शन अदालतमध्ये सोडविले जातील असेही माळी म्हणाले. बी. श्रीनिवास यांनी आजारी पेन्शनर्स व खातेदारांना घरपोच सेवा देण्याचा निर्धार व्यक्त केला. भास्करराव सरदेशमुख यांनी अध्यक्षीय समारोप केला. ते म्हणाले, संघटना बळकट केल्यास सातव्या वेतन आयोगाचा लाभ घेता येईल. पेन्श्नरांचे इतर प्रश्न सोडविण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी माजलगाव येथील पेन्शनर श्षख चांद पाशा यांनी संघटनेमुळे त्यांचा प्रश्न सुटल्याचा अनुभव कथन केला. प्रास्ताविक पेन्शनर्स अ‍ॅन्ड सिनिअर सिटीझन्स असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष तथा राज्य उपाध्यक्ष अ‍ॅड. पी. ए. गोरकर यांनी केले. सूत्रसंचालन कुलदीप धुमाळे व चैतन्य यांनी केले. पद्माकर रत्नपारखी यांनी आभार मानले. यावेळी संघटनेचे सचिव डी. ए. देशपांडे, सहसचिव सुधाकर सर्वज्ञ, पद्माकरराव रत्नपारखी, पी. व्ही. कुलकर्णी, रवींद्र केंडे, प्रा. आशा पोहेकर, श्रीराम कुलकर्णी, प्रकाश चैतन्य, शेख गयासोद्दीन, डी. एस. कुलकर्णी, सय्यद अहमद, अनंतराव लांडगे, विठ्ठल राजहंस तसेच संघटनेचे पदाधिकारी, सर्व तालुकाध्यक्ष, पेन्शनर्स व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमात पेन्शनर्स असोसिएशनच्या वतीने २५ हजार रुपये मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मदत देण्यात आली.

टॅग्स :BeedबीडBanking Sectorबँकिंग क्षेत्र