शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

प्रसुतीवेळी स्त्री रोगतज्ज्ञ नसल्याने बाळ दगावले, नातेवाईकांकडून रूग्णालयाची तोडफोड

By सोमनाथ खताळ | Updated: August 16, 2023 20:54 IST

प्रकरण दडपले राजकीय दबाव; कनूरच्या स्त्री व कुटीर रूग्णालयातील प्रकार

बीड : तालुक्यातील नेकनूर येथील स्त्री व कुटीर रूग्णालयात तब्बल सहा स्त्री रोग तज्ज्ञ आहेत. पंरतू प्रसुतीच्यावेळी एकही हजर नसल्याने एका महिलेचे बाळ दगावले. ही घटना ५ ऑगस्ट रोजी पहाटे ६ वाजता घडली. यावेळी नातेवाईकांनी आक्रमक होत रूग्णालयाची तोडफोड केली. याची अत्यंत गोपनियता पाळत स्थानिक व राजकीय पुढाऱ्यांनी हे प्रकरण दडपण्यात आले. परंतू वैद्यकीय अधीक्षकांनी दिलेल्या अहवालानंतर या प्रकरणाला वाचा फुटली आहे.

२१ वर्षीय महिला (रा.बंदेवाडी ता.केज) या ५ ऑगस्ट रोजी १२ वाजता नेकनूरच्या स्त्री व कुटीर रूग्णालयात दाखल झाल्या. ॲडमिट झाल्या तेव्हा डॉक्टरांनी तपासून प्रकृती ठिक असल्याचे सांगितले. ५ वाजताही तपासणी केली तेव्हा बाळाचे ठाेके आणि मातेची प्रकृती स्थिर होते. परंतू सहा वाजता मातेला कळा सुरू झाल्या. परंतू प्रसुतीसाठी रूग्णालयात एकही स्त्री रोग तज्ज्ञ हजर नव्हते. त्या दिवशी ड्यूटीवर असणाऱ्या डॉ.सोनम जायभाये या देखील उशिरा आल्या. तोपर्यंत परिचारीकांनी प्रसुती केली परंतू बाळ मयत जन्माला आले.

ही बातमी समजताच नातेवाईकांनी रूग्णालयातील काचांची तोडफोड केली. त्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता. परंतू काही राजकीय पुढारी आणि डॉक्टरांनी नातेवाईकांवर दबाव आणत तक्रार देण्यापासून परावृत्त केले. त्यामुळे हे प्रकरण दडपले. परंतू याच रूग्यालयातील डॉक्टरांनी जिल्हा शल्य चिकित्सकांनी अहवाल दिला असून त्यानंतर याला वाचा फुटली आहे. आता याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

कोण काय म्हणतंय...याबाबत नेकनूरच्या कुटीर रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.अशिलाक शिंदे यांनी फोन घेतला नाही. स्त्री रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.अशोक हुबेकर म्हणाले, याचा अहवाल वरिष्ठांना दिला आहे. स्त्री रोग तज्ज्ञ डॉ.सोनम जायभाये म्हणाल्या, मी त्या दिवशी कॅम्पसमध्येच होते. वैद्यकीय दृष्ट्या असे प्रकार क्वचितच घडतात. सुरूवातीला सगळे काही चांगले असताना शेवटच्या क्षणी असे काय घडले, हे आम्हाला पण समजले नाही. असे काही होईल, म्हणून वाटले पण नव्हते. परंतू यात हलगर्जी झालेली नाही, असे सांगितले.

स्त्री रूग्णालयातच सुविधांचा अभावनेकनूरमध्ये महिलांना सर्व सेवा मिळाव्यात, यासाठी स्त्री व कुटीर रूग्णालय तयार केले. हे दोन्ही रूग्णालय एकाच इमारतीत सुरू आहेत. येथे सहा स्त्री रोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, सर्जन असे अधिकारी काम करतात. असे असतानाही येथे वेळेवर व तत्पर सेवा दिल्या जात नसल्याने मृत्यू होत आहेत. यापू्र्वीही हे रूग्णालय वादात सापडले होते. आता पुन्हा एकदा येथील गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलBeedबीड