शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

डीएनए चाचणीसाठी घेतले त्या बाळाच्या रक्ताचे नमुने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 01:12 IST

: मुल अदलाबदल प्रकरणात पोलिसांनी जिल्हा रूग्णालयातील डॉक्टर, परिचारिकांचे जबाब बुधवारी नोंदविले आहेत. तर सायंकाळच्यावेळी खाजगी रूग्णालयातील डॉक्टर, परिचारिकांचे जबाब नोंदविले जाणार होते. दरम्यान, पायाचे ठसे घेतल्यानंतर बुधवारी त्या बाळाचे डीएनए (डीआॅक्सीरिबोन्यूक्लिकाईक अ‍ॅसिड) नमुने तपासणीसाठी घेतल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.

ठळक मुद्देबीडमधील मूल अदलाबदल प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : मुल अदलाबदल प्रकरणात पोलिसांनी जिल्हा रूग्णालयातील डॉक्टर, परिचारिकांचे जबाब बुधवारी नोंदविले आहेत. तर सायंकाळच्यावेळी खाजगी रूग्णालयातील डॉक्टर, परिचारिकांचे जबाब नोंदविले जाणार होते. दरम्यान, पायाचे ठसे घेतल्यानंतर बुधवारी त्या बाळाचे डीएनए (डीआॅक्सीरिबोन्यूक्लिकाईक अ‍ॅसिड) नमुने तपासणीसाठी घेतल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. या प्रकरणाची गुंतागुंत दिवसेंदिवस वाढत असून सर्वचजण संशयाच्या भोवऱ्यात आहेत.

छाया राजू थिटे (हिंगोली, ह.मु.रा.कुप्पा ता.वडवणी) या महिलेने ११ मे रोजी सायंकाळी ४.४५ वाजता मुलाला जन्म दिला. त्याची नोंद प्रसुती विभागात झाली. त्यानंतर वजन कमी असल्याने त्याला अतिदक्षता विभागात दाखल केले. परंतु येथील डॉक्टरांनी त्याला खाजगी रूग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. यावेळी येथेही मुलाची नोंद केली. त्याप्रमाणे रात्रीच बाळाला बसस्थानकासमोरील श्री बाल रूग्णालयात दाखल केले. येथील डॉक्टरांनी मात्र मुलाऐवजी मुलगी अशी नोंद केली. त्याच्यावर दहा दिवस उपचार केल्यानंतर सुट्टी दिली. यावेळी नातेवाईकांच्या हाती मुलगी पडल्याने ते भांबावले आणि त्यांनी संताप व्यक्त करीत बाळ स्वीकारण्यास नकार दिला. त्यानंतर त्यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार केली होती.

दरम्यान, बुधवारी शहर पोलिसांनी जिल्हा रूग्णालयातील तीन डॉक्टर व तीन परिचारीकांचे जबाब घेतले आहेत. यामध्ये त्यांनी बाळाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला औरंगााबदला हलविण्याचा सल्ला दिल्याचे म्हटले आहे. तर सायंकाळी खाजगी रूग्णालयातील डॉक्टर, परिचारिकांचे जबाब नोंदविणार असल्याचेही पोलीस निरीक्षक सय्यद सुलेमान म्हणाले.बाळावर जिल्हा रूग्णालयात उपचारनातेवाईकांनी त्या बाळाला स्विकारण्यास नकार दिल्याने पोलिसांनी ते बाळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले. येथे त्याला अतिदक्षता विभागात ठेवले असून त्यावर विशेष लक्ष ठेवण्याचे आदेश जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी दिले आहेत. तसेच पोलिसांच्या मागणीप्रमाणे बाळाचे डीएनए तपासणीसाठी दिल्याचेही ते म्हणाले.

टॅग्स :Beedबीडhospitalहॉस्पिटलMarathwadaमराठवाडा