पाटोदा : येथील वसंतदादा पाटील महाविद्यालयातील बी. कॉम. प्रथम वर्षाची विद्यार्थिनी आयेशा शेख हिचा सत्कार करण्यात आला. बीडच्या मिल्लिया महाविद्यालयात २८ डिसेंबर २०२० रोजी झालेल्या पाचव्या राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत आयेशाने व्दितीय क्रमांक पटकावला. ‘कोरोनानंतरचे जग’ या विषयावर तिने आपले विचार मांडले होते.
देगावमध्ये ई-पीक पाहणी प्रात्यक्षिक
वडवणी : तालुक्यातील देवगावमध्ये तलाठी अल्लुरे यांच्या उपस्थितीत पीक पाहणी प्रात्यक्षिक कार्यक्रम घेण्यात आला. बाबू भागुजी गवळी, ज्ञानेश्वर गवळी, राजेभाऊ गवळी यांच्या शेतातील विविध पिकांची माहिती ई-पीक पाहणी ॲपवर अपलोड करण्यात आली. शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यात आले. यावेळी विलास गवळी, रामराव गवळी, सुरेश गवळी, सावळाराम जाधव, तुकाराम सुरवसे, अनिल पोळ उपस्थित होते.
पूज्य भदन्त डॉ. आनंद कौशल्यायन यांची जयंती
बीड : थोर पाली पंडित तसेच लेखक व अनुवादक डॉ. भदन्त आनंद कौशल्यायन यांची ११६ वी जयंती प्रियदर्शी धम्मसंस्कार शिक्षण संस्थेच्या शिवणी येथील नगरीमध्ये साजरी करण्यात आली. प्रथम महामानवांना अभिवादन करुन पंचशील त्रिशरण घेण्यात आले. त्यानंतर प्रा. डॉ. प्रेमचंद सिरसाट व इंजिनियर वसंतराव तरकसे यांनी डॉ. कौशल्यायन यांच्याविषयी माहिती दिली. यावेळी कॅप्टन राजाभाऊ आठवले, प्रशांत वासनिक, अॅड. प्रा. अशोक गायकवाड, शिवणी ग्रामस्थ, उपासक उपस्थित होते. सरणात्तयने व नंतर खिरदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
महाआरोग्य व रक्त तपासणी शिबिर
बीड : तालुक्यातील सोन्नाखोटा येथे महाआरोग्य व रक्त तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरात डाॅ. राम बडे, डॉ. सुमंत आंधळे, डॉ. श्रीराम भांगे, डॉ. सतीश मुंडे, डॉ. मेघराज आंधळे, डॉ. भाग्यश्री बडे यांनी आजाराचे निदान करून मोफत उपचार केले. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी सरपंच बिभीषण खोटे, ज्ञानदेव आंधळे, महादेव खोटे, श्रीमंत साळुंखे, महादेव खोटे, जयदेव खोटे, शहादेव खोटे, भैरवनाथ शिंदे, शिवराम खोटे आदी उपस्थित होते.