शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

पीक विमा देण्यास टाळाटाळ करणाऱ्या दोन्ही विमा कंपन्यांवर फौजदारी कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 00:02 IST

बीड : विमा कंपनीनी अर्ज नाकारल्याने प्रधानमंत्री पीकविमा योजनेतील लाभार्थी लाभापासून वंचित राहिलेले आहेत. गतवर्षीच्या खरीप व रबी हंगामासाठी ...

ठळक मुद्देधनंजय मुंडे : जिल्ह्यातील विविध विकास कामे, योजनांचा घेतला आढावा; हजारो लाभार्थी राहिले आहेत वंचित

बीड : विमा कंपनीनी अर्ज नाकारल्याने प्रधानमंत्री पीकविमा योजनेतील लाभार्थी लाभापासून वंचित राहिलेले आहेत. गतवर्षीच्या खरीप व रबी हंगामासाठी देय पीक विमा देण्यास टाळाटाळ करणा-या दोन्ही पीक विमा कंपन्यांवर फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हा आढावा बैठकीत दिले. वाहन परवाना, अपंगत्त्व दाखले, सात बारा आदि कारणांसाठी पीकविम्याचे अर्ज नाकारल्याप्रकरणी जिल्हाधिकारी यांनी बैठक घेऊन पुढील बैठकीत सुस्पष्ट अहवाल सादर करावा, असेही धनंजय मुंडे यांनी यावेळी स्पष्ट निर्देश दिले.बीड जिल्ह्यातील विविध विकास कामे आणि योजनांच्या संदर्भात आयोजित आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित या बैठकीस आ.प्रकाश सोळंके, आ.सुरेश धस, आ. लक्ष्मण पवार, आ. बाळासाहेब आजबे, आ. संदीप क्षीरसागर, आ. नमिता मुंदडा, प्रभारी जिल्हाधिकारी अजित कुंभार, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण धरमकर, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव, बजरंग सोनवणे, आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.विविध शासकीय विभागांतील रिक्त पदे हा जिल्ह्याच्या विकासातील मोठा अडसर असून एप्रिल ते जूनपर्यंत टप्प्याटप्प्याने पदभरतीचा प्रश्न मार्गी लावणार आहे. तसेच जिल्ह्यात दुष्काळ, पिण्याचा पाणीप्रश्न असे अनेक गंभीर प्रश्न आहेत. तसेच व्यक्तिगत लाभाच्या योजनांच्या अंमलबजावणीमध्येही जिल्हा मागे आहे. या पार्श्वभूमिवर लोकप्रतिनिधी व अधिकारी यांनी गतीने काम केल्यास जिल्ह्याचे विकासाचे स्वप्न साकार होईल, असे धनंजय मुंडे यावेळी म्हणाले.महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची माहिती तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी. या योजनेची गतीने अंमलबजावणी करावी. त्यासंदर्भात जिल्हाधिकारी यांनी दैनंदिन आढावा घ्यावा. तसेच, गटसचिवांचे रखडलेले मानधन देण्याबाबत सात दिवसात कार्यवाही करावी अन्यथा संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी. तसेच यासंदर्भात सहकार विभाग यांनी बँकांना निर्देश द्यावेत, असे त्यांनी स्पष्ट केले.थकबाकी : रखडलीजिल्हा मध्यवर्ती बँकेत जिल्हा परिषदेच्या थकित रकमेबाबत सात वर्षांत कार्यवाही केली नसल्याबद्दल संबंधितांवर कारवाई करावी, जलयुक्त शिवार अभियानांतर्गत प्राप्त तक्र ारींची चौकशी करावी. चौकशीसाठी २० दिवसांची कालमर्यादा द्यावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. जिल्हा नियोजन समितीची बैठक साधारणत: १८ जानेवारीच्या आसपास घेण्यात येईल. त्यापूर्वी जिल्ह्याला पूर्णवेळ जिल्हाधिकारी देण्याचे संकेत त्यांनी दिले.

टॅग्स :BeedबीडDhananjay Mundeधनंजय मुंडेCrop Insuranceपीक विमा