शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
4
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
5
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
6
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
7
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
8
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
9
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
10
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
11
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
12
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
13
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
15
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
16
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
17
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
18
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
19
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
20
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक

धान्य घोटाळ्याची माहिती विधानमंडळ सचिवालयास देण्यास टाळाटाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 13:12 IST

२ महिन्यांपासून मंत्रालयातून विचारणा होऊनही जिल्हा प्रशासनाची टाळाटाळ

ठळक मुद्देबीड येथील शासकीय धान्य गोदाम घोटाळ्यामुळे कायम चर्चेत आहे.अतारांकित प्रश्नाचे उत्तर सचिवालयात पाठवण्यास विलंब

- प्रभात बुडूख 

बीड : मुंबईच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने एप्रिल महिन्यात बीड येथील शासकीय धान्य गोदामाची तपासणी करून मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार उघडकीस आणला होता. मात्र या प्रकरणात गोदाम व्यवस्थापकाचे निलंबन आणि गुन्हे दाखल करणे यापलीकडे कुठलीही ठोस कारवाई झालेली नाही. हा विषय विधिमंडळातही उपस्थित करण्यात आला आहे. मात्र मागच्या २ महिन्यांपासून मंत्रालयातून याबाबत विचारणा होऊनही जिल्हा प्रशासन याची माहिती देत नसल्याचे चित्र आहे. 

बीड येथील शासकीय धान्य गोदाम घोटाळ्यामुळे कायम चर्चेत आहे. या धान्य गोदामात मोठ्या प्रमाणावर धान्याचा अपहार झाल्याचा अहवाल मुंबई येथील अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या पथकाने १ एप्रिल रोजीच जिल्हाधिकारी दिला होता, तसेच यात कारवाईच्या सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानंतर याविषयात अधिवेशन सुरु असताना सदस्यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. तेव्हापासून या प्रश्नाचे उत्तर मंत्रालयातून विचारली जात आहे. मंत्रालयीन कक्ष अधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाला ही माहिती मिळण्यासाठी ३ पत्रे पाठविली आहेत. मात्र जिल्हा प्रशासनाने याची कुठलीही माहिती संबंधित यंत्रणेकडे दिली नाही.

मुंबई येथील पथकाने दिला होता अहवाल बीड येथील शासकीय धान्य गोदामांची तपासणी मुंबई येथील पथकाने करून १ एप्रिल २०१९ रोजी आपला अहवाल जिल्हाधिकारी यांना दिला होता. यात मोठ्याप्रमाणात धान्य कमी आढळून आल्याने धान्याच्या आधारभूत किमतीनुसार ६९ लाख ८४ हजार १६१ रुपयांची वसुली करण्याची शिफारस अहवालात करण्यात आली होती. त्यानंतर गोदाम व्यवस्थापकाला निलंबित करण्यात आले आणि त्यानंतरही या प्रकरणात जुलै महिन्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. घोटाळा समोर आल्यानंतरही तहसीलदार अथवा जिल्हा पुरवठा विभागाने कारवाईस विलंब केला होता. हाच प्रश्न विधानमंडळात देखील उपस्थित करण्यात आला होता. दरम्यान या प्रश्नाचे उत्तर व माहिती मागून देखील माहिती न मिळाल्यामुळे या प्रश्नाचे उत्तर विधानमंडळ मात्र विधानमंडळ सचिवालयास पाठविण्यास विलंब होत आहे. त्यामुळे तात्काळ माहिती द्यावी ही माहिती संबंधितांकडे वेळेत पोहोचली नाही तर सर्वस्वी संबंधित कार्यालयाची जबाबदारी राहिल व कारवाई होईल असे नमूद आहे.

टॅग्स :Beed collector officeजिल्हाधिकारी कार्यालय बीडfraudधोकेबाजीState Governmentराज्य सरकारMantralayaमंत्रालय