या केंद्रावर सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या. त्याबरोबर रुग्णांना मनोरंजनासाठी भक्तिगीतांच्या गाण्याचे कार्यक्रम घेतले जातात. भजनाचा कार्यक्रम घेतला जातो. अजून पुढे जे शक्य होतील, ते कार्यक्रम घेण्याची त्यांनी तयारी केली आहे. अरविंद जाधव यांच्यासोबत त्यांचे जिवलग विशाल शिंदे हे पण मोलाची भूमिका निभावत आहेत.
नेकनूर येथील युवा उद्योजक अरविंद जाधव यांनी गेल्यावर्षी गरीब २०० कुटुंबांना एक महिन्याचा पुरेल एवढा किराणा आणि धान्य कोणताही गाजावाजा न करता मोफत वाटप केले होते. सरकारी दवाखान्यातील रुग्णांना प्रत्येक महिन्याला फळे , बिस्कीट, पाणी वाटप करत असतात.
रुग्ण देतात अरविंदला आशीर्वाद
कोविड केअर सेंटरवरच मुक्काम आणि रुग्णाला दिले जाणारे जेवण ते घेतात आणि २४ तास त्यांची सेवा करतात. कोणतीही अडचण असो अरविंद जाधव हे मदतीसाठी सदैव तत्पर असतो.
मनाला समाधान मिळते
कोरोना महामारीमुळे अनेक जण अडचणीत आले आहेत. अनेक बाधित रुग्णांसमोर राहण्याचा, औषधोपचाराचा प्रश्न आहे. त्यांची ही अडचण दूर करून मदत करण्याचा प्रयत्न आहे. रुग्णांना मदत केल्याचे समाधान मिळते.
अरविंद जाधव, उद्योजक, नेकनूर
===Photopath===
280521\28_2_bed_22_28052021_14.jpeg
===Caption===
अरविंद जाधव