शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

भाईगिरीच्या नादात भरकटली शिक्षणाची वाट, कुसंगत नडली अन गेला गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2022 12:54 IST

टपरीचालक खून प्रकरणातील मुख्य आरोपी अभियांत्रिकीचा विद्यार्थी

- संजय तिपालेबीड : वडील शिक्षक, घरात शिक्षणाचे वातावरण... मुलगा अभ्यासात हुशार.. पुण्याच्या चांगल्या महाविद्यालयात अभियांत्रिकीला प्रवेश मिळालेल्या प्रथमेश घुले याची फिल्मीस्टाईल भाईगिरीच्या नादात शिक्षणाची वाट भरकटली अन् तो पाहता पाहता खुनासारख्या गंभीर गुन्ह्यात अडकला. शहरातील टपरीचालक किशोर गुरखुदे खून प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींपैकी एक अभियांत्रिकीचा विद्यार्थी आहे. शिक्षण घेऊन करिअर घडविण्याच्या वयात कारागृहात गेलेल्या चाैघांचा गुन्हे प्रवास ‘चलता है...’ म्हणत बेफाम वागणाऱ्या तरुणाईला आत्मपरीक्षण करायला लावणारा आहे.

युवराज देवावाले (रा. थिगळे गल्ली, बीड) हा व्यवस्थापक असलेल्या हॉटेलात १६ जानेवारी रोजी जेवणाचे बिल देण्यावरून वाद झाला होता. तो सोडविण्यासाठी युवराजने आपले मामा किशोर गुरखुदे (वय ४३, रा. जव्हेरी गल्ली) यांना बोलावले होते. यावेळी गुरखुदे यांच्यावर रॉड व लाकडी दांड्याने हल्ला केला होता. उपचारादरम्यान २३ जानेवारी रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. वाद मिटविण्यासाठी आलेल्या किशोर यांना हकनाक आपला जीव गमवावा लागला.

कपिल जोशी (रा. पांगरी रोड, बीड), प्रथमेश घुले (रा. अंकुशनगर, बीड) , आतीश ऊर्फ लकी कंडेरे, आकाश कंडेरे या चौघांवर शिवाजीनगर ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद झाला. सुरुवातीला कपिल, नंतर प्रथमेशला बेड्या ठोकल्या, तर ३१ जानेवारी रोजी रात्री कपिलधार (ता. बीड) येथे डोंगर परिसरात लपून बसलेल्या आतीश व आकाश कंडेरे या भावंडांना उपनिरीक्षक बाळराजे दराडे, पो. ना. विष्णू चव्हाण, शिवनाथ उबाळे, सचिन आगलावे यांनी अटक केली.

गुन्हेगारी पार्श्वभूमी...पोलीस सूत्रांनुसार, प्रथमेश घुलेवर बलात्कार, घरात घुसून मारहाणीचे दोन गुन्हे नोंद आहेत, तर कंडेरे बंधूंवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंद आहे. या गुन्ह्यात ते नुकतेच जामिनावर सुटले होते.

चौघेही जिल्हा कारागृहातया प्रकरणातील चारही आरोपींना अटक केली आहे. ३१ जानेवारी रोजी पकडलेल्या कंडेरे बंधूंची १ फेब्रुवारी रोजी न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली. आता चौघेही जिल्हा कारागृहात आहेत. तीन आरोपींचे पूर्वीचे गुन्हेगारी रेकॉर्ड आढळून आले आहेत.- बाळराजे दराडे, पोलीस उपनिरीक्षक व तपास अधिकारी

सोशल मीडियात हिराेगिरीआकाश कंडेरे व आतीश ऊर्फ लकी हे सख्खे भाऊ आहेत. महाराजा ग्रुप नावाने त्यांनी दीडशेवर तरुण जोडले होते. व्हॉट्सॲप ग्रुप काढून त्यात हिरोगिरी करणारे फोटो, व्हिडीओ शेअर करून प्रभाव पाडत, अशी माहिती उपनिरीक्षक बाळराजे दराडे यांनी दिली.

पालकांनी घ्यावी काळजीआपला पाल्य मोबाइलवर काय पाहतो, त्याचे मित्र कोण, तो कोणासोबत राहतो, रात्री उशिरा येतो का, या बाबींकडे पालकांनी लक्ष दिले पाहिजे. स्टेट्सला आक्षेपार्ह फोटो असतील, अभ्यासाकडे दुर्लक्ष झाले असेल तर त्याला वेळीच समज द्यावी. कुसंगतीमुळे हुशार मुलेही कधी-कधी चुकीच्या मार्गाने जाण्याची शक्यता असते. तेव्हा पालकांनी आपली जबाबदारी ओळखली पाहिजे.- संतोष वाळके, उपअधीक्षक, बीड

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड