शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

पोटच्या मुलींवर अत्याचार; बापास १० वर्षे सक्त मजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 00:23 IST

पोटच्या दोन अल्पवयीन मुलींवर वारंवार अत्याचार करणाºया नराधम बापास १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा विशेष सत्र न्या. बी. व्ही. वाघ यांनी ठोठावली. नात्याला काळीमा फासणारी ही घटना ३० डिसेंबर २०१४ रोजी आष्टी तालुक्यात घडली होती. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली होती.

ठळक मुद्देआष्टी तालुक्यातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : पोटच्या दोन अल्पवयीन मुलींवर वारंवार अत्याचार करणाºया नराधम बापास १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा विशेष सत्र न्या. बी. व्ही. वाघ यांनी ठोठावली. नात्याला काळीमा फासणारी ही घटना ३० डिसेंबर २०१४ रोजी आष्टी तालुक्यात घडली होती. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली होती.

या प्रकरणात पीडित मुली १२ व १६ वर्षाच्या आहेत. मोठ्या मुलीवर या बापाची नजर गेली. घरात कोणी नसल्याचा फायदा घेत त्याने मोठ्या मुलीवर अत्याचारास सुरुवात केली. अनेक दिवस मोठी मुलगी बदनामीपोटी गप्प राहिली. तिच्या गप्प राहण्याचा फायदा घेत त्याने छोट्या मुलीकडे मोर्चा वळवला. मोठी मुलगी शाळेत व त्यांची आई बाहेर गेल्यानंतर तो तिच्याशी लगट करायचा. यातून तिला धमक्या देत अत्याचार करु लागला. ही बाब पीडित मुलींनी आईला सांगितली. आईलाही हा प्रकार ऐकून धक्का बसला. तिने धीर धरत या नराधम बापाविरुद्ध आष्टी ठाण्यात फिर्याद नोंदवली. पीडित मुलींनीही तक्रार दिली.

त्यानुसार नराधम बापावर कलम ३७६ (२) (एच), ३२३, ५०४, ५०६ भादंवि, कलम ४, ६, ११ लैंगिक अपराधापासून बाल संरक्षण अधिनियम, २०१२ प्रमाणे गुन्हा दाखल झाला. आष्टी ठाण्याचे तत्कालीन पो. नि. दिनेश आहेर यांनी या प्रकरणाच्या तपासास सुरुवात केली. तपासाअंती दोषारोप पत्र विशेष न्यायालयात दाखल केले. या प्रकरणाची सुनावणी बीड येथील विशेष न्या. व अति. जिल्हा व सत्र न्या. बी. व्ही. वाघ यांच्या न्यायालयात झाली.

सरकारी पक्षाच्या वतीने १२ साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदार, परिस्थितीजन्य पुराव्यांचे अवलोकन करुन जिल्हा सरकारी वकील अजय दि. राख यांनी युक्तिवाद केला. त्यावरुन बापास लैंगिक अपराधापासून बाल संरक्षण अधिनियम, २०१२ चे कलम ५ (एन) व भादंविचे कलम ३७६, ५०६, ५११, ३२३ प्रमाणे दोषी ठरवत १० व ५ वर्षे एकत्रित सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. सरकारी वकील अजय राख यांना सहायक सरकारी वकील मंजुषा दराडे, नामदेव साबळे व इतर सहायक सरकारी वकिलांनी सहकार्य केले. तपास अधिकारी म्हणून दिनेश आहेर यांनी काम पाहिले.