शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाचे आमिष दाखवून विधवा प्राध्यापिकेवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 00:06 IST

विधवा घरमालक महिलेस लग्नाचे आमिष दाखवून भाडेकरूने अत्याचार केल्याची घटना शहरात उघडकीस आली आहे. पीडितेच्या तक्रारीवरून भाडेकरूवर अंबाजोगाई शहर ठाण्यात बलात्काराचा गुन्हा नोंदविला आहे.

अंबाजोगाई : विधवा घरमालक महिलेस लग्नाचे आमिष दाखवून भाडेकरूने अत्याचार केल्याची घटना शहरात उघडकीस आली आहे. पीडितेच्या तक्रारीवरून भाडेकरूवर अंबाजोगाई शहर ठाण्यात बलात्काराचा गुन्हा नोंदविला आहे.राम धर्मराज जोगदंड (रा. भाटुंबा, ता. केज) असे आरोपीचे नाव आहे. भाटुंब्याचा माजी सरपंच असलेला राम गतवर्षी आॅक्टोबरमध्ये पीडितेच्या घरी किरायाने राहण्यासाठी आला. पीडित महिला एका महाविद्यालयात प्राध्यापिका असून विधवा आहे. त्यांचा मुलगा शिक्षणासाठी बाहेरगावी असतो. पहिल्याच महिन्याचे भाडे थकल्याने पीडितेने पैशाची मागणी केली असता पत्नीच्या आजारपणाचे कारण पुढे करून रामने भाडे देण्याचे टाळले. त्यानंतरही दर महिन्याचे भाडे थकित ठेवले. दरम्यानच्या काळात रामने पीडितेशी जवळीक साधून लग्नाचे आमिष दाखवत फेब्रुवारी महिन्यापासून अनेकदा अत्याचार केला. पत्नीच्या उपचारासाठी म्हणून तिच्याकडून ५० हजार रुपये हातउसने देखील घेतले. त्यानंतर पीडितेने आठ महिन्याचे भाडे आणि उसने दिलेले ५० हजार रुपये वापस मागितले असता रामने उद्धट वागणूक सुरु केली. त्यामुळे पीडितेने त्याला घर सोडण्यास सांगितले. ६ जुलै रोजी रामने मद्यधुंद अवस्थेत घरी येऊन तिला अश्लील शिवीगाळ केली. पीडितेने पोलिसात जाण्याची धमकी देताच पोलीस व राजकारणी माझ्या खिशात आहेत अशी वल्गना केली. त्यानंतर तिच्या मुलाला आणि आईवडिलांना जीवे मारण्याची धमकी देत त्याने पुन्हा अत्याचार केला. गुरुवारी पीडिता महाविद्यालयात गेली असता राम तिथेही पोचला आणि तिला गाठून महाविद्यालयाबाहेर येण्याची वेळ विचारली व प्रवेशद्वारावर वाट पाहत थांबला. आता हा आपल्याला मारून टाकणार अशी शंका आल्याने पीडितेने शहर ठाण्यात फोन करून पोलिसांना बोलावून घेतले. पोलिसांनी धाव घेत रामला बेड्या ठोकल्या. त्यानंतर बलात्काराचा गुन्हा नोंद झाला.

टॅग्स :BeedबीडRapeबलात्कारCrime Newsगुन्हेगारी