शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

मुस्लीम मावळ्याचे थक्क करणारे समर्पण; शिवनेरीवरुन २०० किलोमिटरवरील गावात पायी नेतो शिवज्योत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2021 16:13 IST

उच्चशिक्षित मुस्लीम मावळ्याची शिवनेरी ते सावंगी पाटण अशी मागील सात वर्षांपासून शिवज्योत दिंडी

- नितीन कांबळे कडा ( बीड )  आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण येथील एक उच्चशिक्षित युवक समीर शेख हा मागील सात वर्षांपासून अनोख्या पद्धतीने शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत आहे. तो शिवनेरीवरुन २०० किलोमीटर दूर गावात पायी शिवज्योत घेऊन येतो. जातीपातीचे बंधन तोडून सामाजिक सलोख्याचा संदेश देण्याच्या त्याच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. 

समीर शेख या उच्चशिक्षित तरुणाची शिवाजी महाराजांवर निस्सीम श्रद्धा आहे. शिवाजी महाराजांच्या कार्याचा जागर करून त्यांचा सामाजिक सलोख्याचा संदेश दृढ करण्याच्या उद्देशाने मागील ७ वर्षांपासून समीर शिवजयंती अनोख्या पद्धतीने साजरी करत आहे. शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर असलेली शिवज्योत तो दरवर्षी शिवनेरी येथून बीड जिल्ह्यातील सावंगी पाटण या गावी पायी घेऊन जातो. या जयंतीला सुद्धा तो शिवनेरी येथून एकदिवस आणि एका रात्रीचा न थकता प्रवास करून गावी पोहचला आहे. यावेळी त्याच्यासोबत गावातील अजय मरकड, राघव खिलारे, अमीत गवारे, अनंत खिलारे, अजय वाघमारे, सुमीत भगत, शिवराम खिलारे, अमोल खिलारे, कृष्णा भोसले, शुभम भोसले, रोहीत भोसले, रोहीत मरकड, अकुंश फुलमाळी, अक्षय खिलारे, हरि खिलारे, तुषार खिलारे, हरी भोसले यांच्यासह  ५० मावळे सोबत होते.

शिवराय महाराष्ट्रातील सर्वांचे दैवत शिवरायांचे विचार कायम माझ्या मनात असतात. ते माझे दैवत आहे. सात वर्षापासून गावातील तरुणांसोबत शिवनेरीवरून पायी शिवज्योत घेऊन येतो. शिवनेरीवर गेल्यावर मुस्लिम मावळा आहे समजताच मला तेथे खूप मानसन्मान दिला जातो. आमची सर्व व्यवस्था करण्यात येते. शिवरायांच्या महाराष्ट्रात शिवज्योत गावात आणण्याचा मला मान मिळतो याचा मला गर्व असून हे कार्य अविरत सुरु राहील.

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजBeedबीड