शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

छावणी प्रकरणात कारवाईसंदर्भात आयुक्तांकडून प्रशासनाला विचारणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 23:41 IST

जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीत मोठ्या प्रमाणावर छावण्या सुरु होत्या, या छावण्यांमध्ये काही गैरप्रकार सुरु असल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्तालयाच्या पथकाने व जिल्हा स्तरावर या छावण्यांची अचानक तपासणी केली होती.

ठळक मुद्देछावणी प्रकरण : दोन महिन्यांपूर्वीच्या त्रुटी अहवालावर कारवाई नाही

बीड : जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीत मोठ्या प्रमाणावर छावण्या सुरु होत्या, या छावण्यांमध्ये काही गैरप्रकार सुरु असल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्तालयाच्या पथकाने व जिल्हा स्तरावर या छावण्यांची अचानक तपासणी केली होती. या तपासणीत आढळलेल्या त्रुटींचा अहवाल आयुक्तालयाने जिल्हा प्रशासनाला दोन महिन्यापूर्वी दिला होता. यावर जिल्हा प्रशासनाने काय कारवाई केली याची विचारणा विभागीय आयुक्तांनी केली आहे. मात्र, हा अहवाल अद्यापपर्यंत पाठवण्यात आलेला नाही. यासाठी प्रशासनाला ८ आॅगस्टची मुदत देण्यात आली होती.बीड जिल्ह्यातील कोल्हारवाडीच्या छावणीवर गैरप्रकारामुळे व तेथे तपासणीसाठी गेलेल्या महिला उपजिल्हाधिकारी यांना अडविल्यामुळे जिल्ह्यातील छावण्यांमधील गैरप्रकार प्रशासनाच्या रडारवर आला होता. त्यानंतर उपायुक्तांच्या पथकाने जिल्ह्यातील विविध चारा छावण्यांना भेटी देऊन पाहणी केली होती.या तपासणीत पथकाला आढळलेल्या त्रुटींचा अहवाल आयुक्तालयाने जिल्हा प्रशासनाला देऊन त्यानुसार कारवाईचे निर्देश दिले होते. यात छावणी चालकांवरील कारवाईसोबतच प्रशासकीय पातळीवरील म्हणजेच कर्मचाऱ्यांवरील कारवाईचाही समावेश होता. मात्र दोन महिन्यापूर्वी सदर अहवाल आल्यानंतरही जिल्हा प्रशासनाने यावर काय कारवाई केली , हे मात्र समजू शकले नाही त्यामुळे या अहवालाचे गूढ कायम आहे.त्यामुळे जुलैच्या शेवटी विभागीय आयुक्तांनी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन या अहवालानुसार कोणाविरुद्ध काय कारवाई केली याची माहिती मागितली होती. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने याबाबत तहसीलदार आणि उपविभागीय अधिकाºयांना विचारणा केली असली तरी नेमकी कोणत्या कर्मचाºयावर जबाबदारी निश्चित केली हे अद्यापपर्यंतसमोर आले नाही. तसेच छावणीप्रकरणात काय कारवाई झाली हे अद्यापपर्यंत समोर आलेले नाही. त्यामुळे आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.

टॅग्स :BeedबीडAgriculture Sectorशेती क्षेत्रDivisional Commissioner Office Aurangabadऔरंगाबाद विभागीय आयुक्तालय