शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
2
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
3
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
4
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
5
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
6
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
7
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
8
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
9
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
10
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
11
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
12
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
13
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
14
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
15
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
16
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
17
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला
18
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
19
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
20
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर

बीडचे वैभव 'सील' होताच पालिकेला जाग; नाट्यगृहासाठी भरली १ कोटींची थकबाकी

By सोमनाथ खताळ | Updated: June 17, 2023 17:35 IST

पालिकेला उशिरा का होईना जाग आल्याने बीडचे सांस्कृतिक मंदिर लिलाव होण्यापासून सुरक्षित राहिले आहे.

बीड : शहराचे वैभव आणि एकमेव असलेले सांस्कृतिक मंदिर यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाचा ताबा द्वारकादास मंत्री बँकेने शुक्रवारी दुपारी साडेचार वाजता घेतला होता. बीड पालिकेने १ काेटी रुपयांचे कर्ज परतफेड न केल्याने ही कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर पालिकेने पालिका खडबडून जागी झाली आणि शनिवारी सकाळीच सर्वच १ काेटी रूपये मंत्री बँकेकडे जमा केले. उशिरा का होईना जाग आल्याने बीडचे सांस्कृतिक मंदिराचा लिलाव होण्यापासून सुरक्षित राहिले आहे.

२००६ साली बीड पालिकेने द्वारकादास मंत्री बँकेकडून पालिकेच्या मुख्य इमारतीसाठी १ कोटींचे कर्ज घेतले होते. गॅरंटर म्हणून बाबुराव दुधाळ आणि किशोर काळे हे दोघे होते. तारण म्हणून यशवंतराव चव्हाण नाट्यगृह ठेवले होते. पालिकेने सुरुवातीचे काही दिवस कर्ज परत केले. परंतु, २०१९ पासून एकही हप्ता भरला नव्हता. २३ मार्च २०२३ रोजी बँकेने पालिकेला नोटीस बजावली होती. तसेच मुख्याधिकारी नीता अंधारे यांचीही भेट घेतली. परंतु, याकडे अंधारे यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे शुक्रवारी दुपारी बँकेच्या अधिकाऱ्यांनी सेक्युरीटायझेशन ॲक्ट २००२ अन्वये तारण ठेवलेल्या नाट्यगृहाच्या इमारतीला नोटीस चिकटवून ताबा घेतला. तसेच आठवडाभरात हे कर्ज परत न केल्यास या नाट्यगृहाचा लिलाव केला जाणार असल्याचेही जाहिर केले होते. या कारवाईने पालिकेचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला होता. त्यानंतर शनिवारी सकाळीच पालिकेने मंत्री बँकेची सर्व बाकी भरली.

रक्कम भरली आहे मंत्री बँकेला आगोदर २ कोटी ९ लाख आणि शनिवारी १ कोटी ४ लाख रूपये भरले आहेत. तसेच ही रक्कम जर जास्त होत असेल तर परत करण्याच्या अटीवर आम्ही ही रक्कम भरली आहे.- नीता अंधारे, मुख्याधिकारी न.प.बीड

कारवाई थांबवली कर्जखाते बेबाक केल्यामुळे बँकेची पुढील कायदेशीर थांबविली जात आहे. सरफेसी कायद्या अंतर्गत चालू केलेली कार्यवाही मागे घेत आहोत.- प्रशांत बोंदार्डे, प्राधिकृत अधिकारी, द्वारकादास मंत्री बँक

टॅग्स :BeedबीडMuncipal Corporationनगर पालिका