रस्त्यांवर मोकाट जनावरे वाढली
माजलगाव : शहरातील मुख्य रस्त्यांवर बसस्थानकासमोर मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरे रस्त्यांवरच ठाण मांडून बसत असल्याने वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे. ही जनावरे मुख्य रस्त्यांतही आजूबाजूच्या व्यापारी संकुलात घुसूनही त्या परिसरात घाण करतात. या मोकाट जनावरांची वर्दळ वाढली आहे. त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होऊ लागली आहे.
ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय
बीड : शासकीय व निमशासकीय व सहकारी बँकांमध्ये वृद्ध, महिला, वयोवृद्ध पेन्शनर व दिव्यांग व्यक्तींना योग्य सेवा मिळत नसल्याने त्यांना मोठ्या गैरसोयीचा व अडचणींचा सामना करावा लागत आहे. सर्व बँकांना व आर्थिक संस्थांना ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र सोय करण्याच्या सूचना करूनही बँकांकडून याबाबत दुर्लक्ष केले जाते. परिणामी, ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय वाढते.