शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

'ॲट्राॅसिटी गुन्ह्यातील आरोपींना अटक करा'; जातीअंत संघर्ष समितीचा अंबाजोगाईत मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 16:47 IST

अंबाजोगाई शहरातील सदर बाजारातून निघून हा मोर्चा उपजिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.

ठळक मुद्देमागील वर्षभरात स्त्री अत्याचार व दलित अत्याचार वाढले आहेत धनदांडगे व लोकप्रतिनिधी यांच्या दबावामुळे आरोपींना अटक होत नाही.

अंबाजोगाई : ॲट्राॅसिटी गुन्ह्यातील आरोपी डाॅक्टरास अटक करून संबंधित रूग्णालयाचे सीसीटिव्ही फुटेज जप्त करावे या मागणीसाठी अंबाजोगाई येथील जातीअंत संघर्ष समितीच्या वतीने बाबुराव पोटभरे यांच्या नेतृत्वाखाली उपजिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी (१२ जुलै) दुपारी मोर्चा काढण्यात आला.

अंबाजोगाई शहरातील सदर बाजारातून निघून हा मोर्चा उपजिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या मोर्चात बहुजन समाजातील आबालवृद्धांनी सहभाग घेतला. विशेषतः महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, अंबाजोगाई उपविभागात मागील वर्षभरात स्त्री अत्याचार व दलित अत्याचार वाढलेले असून धनदांडगे व लोकप्रतिनिधी यांच्या दबावामुळे आरोपींना अटक होत नाही. पोलीस अधिकारी हे राजकीय दबावाखाली असल्यामुळे पिडीतांना न्याय देण्याच्या दृष्टीने आपले कायदेशीर कर्तव्य बजावत नाहीत. डॉ. सुहास यादव यास मदत करणारे त्याचे नातेवाईक यांनी वेगवेगळे राजकीय सोंग घेऊन त्याची धरपकड थांबविली त्या सर्व नातेवाईकांवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत. अॅट्रॉसिटी गुन्ह्यांबाबत गंभीर इशारे देऊनही गरीबांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत पोलीस व महसुल प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्याने पीडितांवर दबाव येत असल्याचे मागील काही दिवसातील घटनांवरुन दिसून येत आहे. त्यामुळे डॉ. सुहास यादव सह इतर अॅट्रॉसिटीज गुन्ह्यामधील सर्व फरार आरोपींना अटक करुन त्यांचा तपास करा अशी मागणी करण्यात आली. या निवेदनावर कॉ. बब्रुवाहन पोटभरे, ऍड. विलास लोखंडे, अस्मिता ओव्हाळ, आशालता पांडे, चित्रा पाटील, अक्षय भूंबे, विनोद शिंदे, अमोल हातागळे, गुड्डू जोगदंड यांच्यासह जाती अंत समितीच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते.

अ‍ॅट्रॉसिटी कायदा हे संविधानाने दिलेले कवचकुंडल-बाबुराव पोटभरेअ‍ॅट्रॉसिटी कायदा हे संविधानाने दलितांना संरक्षणासाठी दिलेले कवचकुंडल आहेत.ही कवचकुंडले जर कोणी काढुन घेण्याचा प्रयत्न करत असेल तर समाज शांत बसणार नाही.ज्या ज्या वेळी दलितांवर अन्याय अत्याचार होईल.तेव्हा रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल.असा इशारा यावेळी बाबुराव पोटभरे यांनी दिला.

टॅग्स :agitationआंदोलनBeedबीड