शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
2
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
3
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
4
"राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
6
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
7
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
8
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
9
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
10
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
11
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
12
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
13
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
14
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
15
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
16
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
17
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
18
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
19
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
20
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...

बीड जिल्हा बॅँकेच्या सुधारित आकृतीबंधास मिळाली मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2019 12:15 AM

राज्यातील काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकांच्या सुधाारित आकृतीबंधास २३ आॅगस्ट रोजी मान्यता देण्यात आलेली असून बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचा ५३४ सेवकमांड (आकृतीबंध) राज्याचे सहकार आयुक्त व निबंधक सतीश सोनी यांनी मंजूर केला आहे. त्यानुसार बॅँकेच्या पटावर ५३४ सेवक काम करु शकणार आहेत.

ठळक मुद्देनाबार्डच्या कार्यबलानुसार अंमल : ५३४ सेवक संख्या मंजूर

बीड : राज्यातील काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकांच्या सुधाारित आकृतीबंधास २३ आॅगस्ट रोजी मान्यता देण्यात आलेली असून बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचा ५३४ सेवकमांड (आकृतीबंध) राज्याचे सहकार आयुक्त व निबंधक सतीश सोनी यांनी मंजूर केला आहे. त्यानुसार बॅँकेच्या पटावर ५३४ सेवक काम करु शकणार आहेत.संगणकीकृत प्रणालीसज्ज जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकांसाठी सेवकमांड व सेवक भरतीची कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी नाबार्डचे उपमहाप्रबंधकांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती गठित केली होती. या समितीने नाबार्डकडील राज्यस्तरीय कार्यबलाकडे अहवाल दिल्यानंतर पुढील प्रक्रिया पार पडली. मानव संसाधन विकास धोरणातील तरतुदी अंतर्गत सेवकमांड व सेवकभरतीच्या कार्यपध्दतीबाबत मार्गदर्शक तत्व निर्गमित केले होते. या अनुषंगाने बीड जिल्हा बॅँकेकडून परिपूर्ण प्रस्ताव दाखल केला होता. आर्थिक स्थितीनुसार ३१ मार्च रोजी जिल्हा बॅँकेचा प्रवर्ग ब, एकूण ठेवी ६२४.१२, येणे कर्ज १०८१.६४ कोटी असा १७०५.७६ कोटी रुपये व्यवसाय असल्याबाबत माहिती सदर प्रस्तावात दिली होती. त्याचबरोबर ३१ मार्च २०१५ अखेरची आर्थिक स्थितीसह १७७०.०१ कोटी रुपये व्यवसायाची माहिती देण्यात आली होती. कार्यबलाच्या अहवालानुसार ब प्रवर्गातील बॅँकांसाठी एकूण ५ विभाग आणि २० उपविभाग निर्माण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यानुसार बॅँकेने अस्तित्वातील विभागांची पुनर्रचना करुन ८ मुख्य विभाग निर्माण केले. तसेच बॅँकेच्या मुख्यालय विभागनिहाय व श्रेणीनिहाय १४७ पदांचा सेवकमांड मंजूर करण्यात आला.जिल्हा बॅँकेच्या ५९ शाखांची चार गटात वर्गवारी करुन पदांचा सेवकमांड शाखेसाठी तयार केला. त्यानुसार ३७८ पदे निर्माण केली आहेत. अशा प्रकारे नाबार्डकडील कार्यबलाच्या सूचना तथा अहवालाचा विचार करुन ५३४ पदांचा सेवकमांड मंजूरीसाठी सादर केला होता. त्यानुसार या सुधारित आकृतीबंधास मान्यता देण्यात आली आहे.हा सेवकमांड ३१ मार्च २०२० या कालावधीपर्यंत कायम राहणार आहे. या मंजूर सेवकमांडपेक्षा कोणत्याही परिस्थितीत जादा कर्मचारी बॅँकेच्या पटावर असणार नाहीत याबाबत दक्षता घेण्याची सूचना राज्याचे सहकार आयुक्त व निबंधक सतीश सोनी बॅँक व्यवस्थापनाला केली आहे.

टॅग्स :BeedबीडBanking Sectorबँकिंग क्षेत्र