फोटो
बीड : शहरातील संस्कार विद्यालयातील पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा
व पालकांचा सत्कार करण्यात आला. फेब्रुवारी २०२०मध्ये झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत ओमराजे दत्तात्रय कवचट २३८ गुण(८२.६३), रिया कृष्णा वांगीकर २३४ गुण (८१.२५), संदीप तांबट २३४ गुण (८१.३४), शंभूराजे दत्तात्रय कवचट २२६ गुण (७८.७४), गीतेश जयंत देशपांडे २१२ गुण (७३.६१), श्रेया श्यामराव दीक्षित २१० गुण (७२.९१), ईशान शरद पिंपरकर २१० गुण (७२.९१) यांनी यश संपादन केले. त्यांचा संस्कार प्रबोधिनी संस्थेच्या वतीने शाळेचे मुख्याध्यापक डी. के. जाधव यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक सुनील सोनवळकर यांनी केले. सूत्रसंचालन शिक्षिका बी. जे. हिवरेकर यांनी केले. या कार्यक्रमास संबंधित विद्यार्थ्यांचे पालक व इयत्ता ५ वी ते ७ वी विभागातील सर्व शिक्षक कोविड-१९ बाबतचे सर्व नियम पाळून उपस्थित
होते.