: येथील भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या श्री सिद्धेश्वर प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापकपदी प्रदीप रंगनाथराव जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मागील अनेक वर्षांपासून श्री सिद्धेश्वर विद्यालय माजलगाव, श्री केशवराज विद्यालय, लातूर या ठिकाणी सहशिक्षक असलेल्या प्रदीप जोशी यांची शिस्तीचे आणि विद्यार्थिप्रिय शिक्षक अशी ओळख आहे.
बीड येथील स्वा. सावरकर प्रा. विद्यालयाचे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असणारे जोशी यांची आता श्री सिद्धेश्वर प्रा. विद्यालयाचे मुख्याध्यापक म्हणून नियुक्ती झाली.
या नियुक्तीबद्दल त्यांचे भारतीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेंद्र आलूरकर, कार्यवाह नितीन शेटे, सहकार्यवाह प्रा. चंद्रकांत मुळे, स्थानिक व्यवस्था मंडळाचे अध्यक्ष प्रकाश दुगड, कार्यवाह अमरनाथ खुर्पे, विश्वासराव जोशी, प्रेमकिशोर मानधने, जगदीश साखरे, तेजस महाजन यांनी अभिनंदन केले आहे.
===Photopath===
020621\purusttam karva_img-20210602-wa0045_14.jpg