शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

'मतदानावेळी बोटावर शाई नव्हे, चुना लावा'; पक्षांतरबंदी कायदा कठोर करण्यासाठी आंदोलन

By शिरीष शिंदे | Updated: July 10, 2023 17:12 IST

पक्षांतरबंदी कायदा कठोर करण्याची सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी

बीड : राज्यातील घडणाऱ्या घडामोडी लोकशाहीसाठी चिंताजनक आहेत. आमदार, खासदार स्वतःच्या स्वार्थासाठी पक्ष बदलतात. सरकार पाडण्याचे अथवा अस्थिर करण्याचे काम करतात. त्यामुळे सर्वसामान्य माणसांच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असून राज्याचा विकास खुंटतो. आयाराम गयाराम संस्कृतीला आळा घालण्यासाठी पक्षांतरबंदी कायद्यांतर्गत सुधारणा करावी, हा कायदा कठोर करावा, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मतदानावेळी बोटावर शाई नव्हे, चुना लावा आंदोलन सोमवारी करण्यात आले.

सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी लोकप्रतिनिधींनी कधीही पक्ष सोडत नाहीत. स्वतःच्या स्वार्थासाठी पक्षांतर केल्याचे दिसून येत आहे. १९८५ मध्ये ५२ व्या घटना दुरुस्ती विधेयकानुसार पक्षांतरबंदी कायदा अस्तित्वात आला. याद्वारे घटनेत दहाव्या परिशिष्टाचा समावेश करून कलम १०२ आणि १९२१ नुसार, आमदारांना, खासदारांना पात्र ठरवणाऱ्या अनुच्छेदामध्ये बदल करण्यात आला. मात्र सध्याची परिस्थिती विचाराधीन घेऊन आयाराम गयाराम संस्कृतीला आळा घालण्यासाठी आणखी कडक कायदा करण्याची आवश्यकता आहे. मतदारांनी दिलेला कौल लोकप्रतिनिधी ज्या पक्षात आहेत त्यांच्यासाठी असतो. त्यामुळे निवडून आल्यानंतर पुढील निवडणुकीपर्यंत पक्ष बदल करता येऊ नये अशी तरतूद करण्यात यावी. जर एखाद्या लोकप्रतिनिधीला पक्ष बदलायचा असेल तर राजीनामा देऊन पुन्हा नवीन पक्षाच्या किंवा ज्या पक्षात जायचे आहे त्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवावी अशी तरतूद करण्यात यावी, अशी मागणी आंदोलकांनी या वेळी केली.

राज्य निवडणूक आयोगासह राज्यपालांना निवेदनपक्षांतरबंदी कायद्यांतर्गत सुधारणा करण्यात येऊन कठोर कायदा करण्यात यावा, या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांच्यामार्फत आयुक्त महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग, राज्यपाल यांना देण्यात आले. आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे, रामनाथ खोड, शेख युनूस, बलभीम उबाळे, शेख मुबीन, शेख मुस्ताक, मिलिंद सरपते, संजय पावले, धनंजय सानप, आपचे जिल्हाध्यक्ष अशोक येडे, भीमराव कुटे, प्रदीप औसरमल, प्रदीप औसरमल, विश्वास डोंगरे, प्रवीण पवार, किष्किंधा पांचाळ आदी सहभागी होते.

टॅग्स :BeedबीडagitationआंदोलनElectionनिवडणूक