शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

संतापजनक ! प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे कोरोना रुग्णाचा मृतदेह १० तास पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2020 10:41 IST

तहसीलदार यांना रात्रीच कळवुन देखील त्यांनी याची दखल घेतली नसल्याचा आरोप रूग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे.

माजलगाव : शहरातील एका कोव्हिड हॉस्पिटलमध्ये रात्री दहा वाजता कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचे निधन झाले. त्याची माहिती प्रशासनाच्या सर्व विभागांना कळवली असतांनाही याकडे दुर्लक्ष केल्याने हा मृतदेह अंत्यसंस्काराशिवाय तब्बल 10 तास एकाच जागेवर पडुन होता. कोरोना प्रसार वाढत असताना अशा प्रकारामुळे प्रशासनाचेच याकडे गांभीर्य नसल्याचे पुढे आल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

माजलगाव तालुक्यात कोरोना रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. तसेच कोरोना पॉझिटिव्ह रूग्णाच्या मृत्यूचे प्रमाण देखील वाढत आहे. शुक्रवारी शहरातील एका कोरोना हॉस्पिटलमध्ये रात्री 10 वाजता एका कोरोना  पॉझिटिव्ह रूग्णाचे निधन झाले. याबाबत येथील डॉक्टर व नातेवाईकांनी आरोग्य , महसुल ,नगरपालिका प्रशासनाला याची माहिती दिली. मात्र तब्बल दहा तास हा मृतदेह रुग्णवाहिकेत पडून होता. या मृतदेहावर तात्काळ अंत्यसंस्कार करणे नगरपालिकेचे काम असताना याकडे दुर्लक्ष करण्यात आले. संबंधीत विभागाच्या कर्मचाऱ्यांना वारंवार सांगुनही ते रात्री न आल्याने मृतदेह सकाळी 8 वाजेपर्यंत रूग्णालयातच पडुन राहिल्याने नातेवाईकांनी संताप व्यक्त केला.

या बाबत तहसीलदार यांना रात्रीच कळवुन देखील त्यांनी याची दखल घेतली नसल्याचा आरोप रूग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे. या पुर्वीही नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे एक मृतदेह 4 ते 5 तास पडुन होता. प्राशासनाने दुर्लक्ष केल्याने मृतदेहाची अवहेलना होत असल्याने मृताच्या नातेवाईकांसह नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeedबीड