शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

कत्तलखान्याकडे जाणारी १५ जनावरे पोलिसांच्या ताब्यात; तिघांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 12:31 IST

Crime News Beed पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्री धारूर-माजलगाव महामार्गावर तेलगावनजीक ही कारवाई केली

ठळक मुद्देटेम्पोमध्ये १५ बैल निर्दयपणे हवाबंद अवस्थेत कोंबल्याचे निदर्शनास आले ही सर्व जनावरे कत्तलखान्याकडे नेण्यात येत होती.  बीड जिल्ह्यात जनावरांची तस्करी उघडकीस

दिंद्रुड ( बीड ) : माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका वाहनातून १५ जनावरांना निर्दयपणे कोंबून तस्करी करण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्री धारूर-माजलगाव महामार्गावर तेलगावनजीक ही कारवाई केली असून तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अधिक वृत्त असे की,  गुरुवारी रात्रगस्ती दरम्यान दिंद्रुड पोलीसांनी जळगावकडून लातुरकडे जाणाऱ्या एका टेम्पोस ( एम एच 18 ए ए 80 31 ) संशयावरून थांबवले. तपासणीमध्ये टेम्पोमध्ये १५ बैल निर्दयपणे हवाबंद अवस्थेत कोंबल्याचे निदर्शनास आले. ही सर्व जनावरे कत्तलखान्याकडे नेण्यात येत होती.  पोलिसांनी जनावरांसह वाहन असा साडे नऊ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. 

ही कारवाई पोलिस उप निरीक्षक विठ्ठल शिंदे, वाहनचालक युनुस शेख, होमगार्ड अक्षय माने यांनी केली. याप्रकरणी पोलिसांनी चालक समाहरिज उस्मान ( ३०, रा. जळगाव) , भिकनखान मोहम्मद खान (४५,रा.मालेगाव जिल्हा नाशिक) , जाकिर अब्दुल अब्दुल शहा (३० ,रा.बोरगाव ता. सिल्लोड)  यांच्याविरोधात कलम 11 (1)(डी),11(1) (इ),11(1)(जी), प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 व कलम 5 (ए) (1), 5(ए) 5 (बी),9 महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियम 1976 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास सपोनि अनिल गव्हाणकर यांच्या निर्देशानुसार पोलिस बिट अंमलदार अनिल भालेराव करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड