शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

कचऱ्यावरून संताप; बीडमध्ये महिलेने फोडल्या पालिकेच्या घंटागाड्या अन् जेसीबी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2020 16:56 IST

बीड शहरातून निघणारा ओला व सुका कचरा शहरापासून जवळच असलेल्या नाळवंडी रोड परिसरातील डंपींग ग्राऊंडवर टाकला जातो.

ठळक मुद्देस्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या नावाने घोषणाबाजी

बीड : कचरा डेपोवर कचरा टाकण्यासाठी गेलेल्या घंटागाड्या व जेसीबी अशी बीड पालिकेच्या मालकीची वाहने एका महिलेने फोडल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. सदरील महिला स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या नावाने घोषणा देत होती. यात पालिकेचे अंदाजे एक लाख रूपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत असून याची अद्याप ठाण्यात नोंद नव्हती.

बीड शहरातून निघणारा ओला व सुका कचरा शहरापासून जवळच असलेल्या नाळवंडी रोड परिसरातील डंपींग ग्राऊंडवर टाकला जातो. याच डेपोच्या बाजुला अनेकांशी शेती आहे. शेतात जाणाऱ्या रस्त्यावरच कचरा टाकला जात असल्याने शेतकऱ्यांना अडचणी येत होत्या. याच मुद्याला धरून सारीका गायकवाड नावाची महिला या मैदानावर पोहचली घंटागाड्यांच्या काचा फोडल्या. तसेच कचरा ढकलण्यासाठी आलेल्या जेसीबीवर जावून काचा फोडल्या. यावर शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे असे म्हणत घोषणाबाजी केली. याचा एक व्हिडीओ देखील सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. दरम्यान, या तोडफोडीत पालिकेचे अंदाजे एक लाख रूपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. मुख्याधिकाऱ्यांनी या प्रकरणात स्वच्छता विभागाला गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले असले तरी याची उशिरापर्यंत ठाण्यात नोंद झाली नव्हती. 

कायदा हातात घेण चुकीचे सदरील महिलेच्या मागणीवरून कचरा बाजुला घेतला जात होता. हे करत असतानाच महिलेने वाहनांची तोडफोड केली. कारवाई केली जात असतानाही कायदा हातात घेणे चुक आहे. यात पालिकेचे अंदाजे एक लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. यात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.- डॉ.उत्कर्ष गुट्टे, मुख्याधिकारी, नगर परिषद बीड

टॅग्स :BeedबीडGarbage Disposal Issueकचरा प्रश्न