शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

अंबाजोगाईत अंगणवाडीताईंनी फटाके फोडून केला ‘मेस्मा’ रद्दचा जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 18:33 IST

मुख्यमंत्र्यांनी हा कायदा रद्द करण्याची घोषणा करताच अंबाजोगाईत महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने सावरकर चौकात फटाके फोडून ‘त्या’ निर्णयाचे स्वागत केले.

अंबाजोगाई (बीड ) : आपल्या न्याय  हक्कासाठी अंगणवाडीताई देखील शासनदरबारी भांडतात. मात्र सरकारने अंगणवाडी सेविकांना ‘मेस्मा’ कायदा लावून त्यांना त्यांच्या न्याय हक्कापासून परावृत्त केले होते. यानंतर शिवसेनेसह विरोधकांनी व महासंघाच्या वतीने ‘मेस्मा’ कायदा रद्द करण्याची मागणी लावून धरली होती. अखेर मुख्यमंत्र्यांनी हा कायदा रद्द करण्याची घोषणा करताच अंबाजोगाईत महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने सावरकर चौकात फटाके फोडून ‘त्या’ निर्णयाचे स्वागत केले.

अंगणवाडी सेविकांना लावलेला ‘मेस्मा’ कायदा त्वरित रद्द करावा  यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी हा प्रश्‍न लावून धरला होता. मात्र महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे मेस्माच्या भूमिकेवर ठाम होत्या. हा कायदा म्हणजे अंगणवाडीताईंना त्यांच्या न्या हक्कापासून दुर  ठेवणे असाच होता. यामुळे अंगणवाडीताईंमध्ये प्रचंड नाराजीचा सुर होता. याची दखल शिवसेनेसह विरोधकांनी घेवून मुख्यमंत्र्यांना अखेर  ‘मेस्मा’ कायदा रद्द करण्यास भाग पाडले. हा कायदा रद्द करण्यात आला असल्याची घोषणा करताच अंबाजोगाई येथे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनिस महासंघाचे प्रदेशाध्यक्ष भगवानराव देशमुख, कृती समिती सदस्य एम. ए. पाटील, प्रदेशउपाध्यक्ष कमल बांगर,  राज्य संघटक दत्ता देशमुख, जिल्हा संघटक सचिन आंधळे, अंबाजोगाई शहराध्यक्षा रोहिणी लोमटे यांच्या नेतृत्वाखाली छाया कुलकर्णी, आम्रता लोमटे, शेख आरूणा, मुल्ला नफिस, पठाण ताहेरा, भाकरे कस्तूर, भाकरे महानंदा, लोमटे आशा, चव्हाण किशोरी, कुलकर्णी माधूरी, जोगदंड सूक्शाला, साबने सूनिता, सय्यद सायराबानो, शिंदे आल्का यांच्यासह आदि कार्यकर्तींनी आंबाजोगोई शहरातील सावरकर चौकात फटाके वाजवून आनंदोत्सव  साजरा केला.

टॅग्स :State Governmentराज्य सरकारAmbajogaiअंबाजोगाईChief Ministerमुख्यमंत्रीVidhan Bhavanविधान भवन