शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
3
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
4
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
5
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
6
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
8
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
9
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
10
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
11
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
12
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
13
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
14
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
15
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
16
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
17
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
18
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
19
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
20
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय

अंगणवाडी मदतनीसाची आत्महत्या?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 05:28 IST

गेवराई तालुक्यातील गुंतेगाव येथील अंगणवाडी मदतनीस निता भागवत शिंदे यांनी केंद्रातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघड झाली आहे.

बीड : गेवराई तालुक्यातील गुंतेगाव येथील अंगणवाडी मदतनीस निता भागवत शिंदे यांनी केंद्रातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघड झाली आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार निता यांचे आधार कार्ड लिंक न झाल्यामुळे त्यांना तीन महिन्यांचे मानधन मिळालेले नव्हते, तर मानधन रखडल्याने निता नैराश्येत होती, असे त्यांचे वडील भागवत शिंदे यांनी सांगितले.निता यांच्या आत्महत्येची ग्रामविकास मंत्रालयाने दखल घेतली असून तत्काळ अहवाल मागविला आहे. जिल्हा परिषद प्रशासनानेही प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. पोलीस आणि जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रविवारी गुंतेगाव येथे शिंदे कुटुंबीयांना भेटून प्रकरणाची माहिती घेतली. सध्या आपली मानसिक स्थिती चांगली नसल्याचे सांगून निताचे वडील भागवत यांनी काहीही लेखी दिले नाही.सहा महिन्यांचे मानधन रखडले होते. त्यासाठी निता पालकमंत्री पंकजा मुंडे यांना भेटण्यासाठी काही दिवसांपूर्वी गेली होती. दिवसभर बीडमध्ये थांबूनसुद्धा पालकमंत्र्यांची भेट होऊ शकली नाही. ती अधिकच वैफल्यग्रस्त झाली होती, असे भागवत शिंदे म्हणाले. घटनेनंतर पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदविला आहे.मानधन मागणीचा अर्ज नव्हतानिता शिंदे या अंगणवाडी मदतनीस म्हणून नोव्हेंबर २०१७ मध्ये रुजू झाल्या होत्या. फेब्रवारीमध्ये बँक खाते दिल्यानंतर जानेवारी व फेब्रुवारीचे मानधन देण्यात आले. उर्वरित मानधनाबाबत त्यांचा मागणी अर्ज नव्हता. प्रशासनाबद्दल तक्रार नसल्याचे सरपंच व ग्रामस्थांनी सांगितले. सुसाईड नोटही नव्हती. आत्महत्येचे कारण व तपास उपविभागीय पोलीस अधिकारी करतील, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी लोकमतला सांगितले.ढिसाळ कारभाराची चौकशीकरा - नीलम गोºहेपतीच्या निधनानंतर निता हिला अंगणवाडी मदतनीस म्हणून मिळणारे मानधन हे एकमेव उदरनिर्वाहाचे साधन होते. ती वयोवृद्ध वडिलांकडेच राहत होती. निता सरकारी व्यवस्थेतील ढिसाळ कारभाराची बळी ठरली. प्रकरणाची चौकशी करून न्याय देण्याची मागणी शिवसेना आमदार डॉ. नीलम गोºहे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली आहे.

टॅग्स :Suicideआत्महत्याnewsबातम्या